पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर साठी 100 कोटींचा निधी मंजूर

सोलापूर :- येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासाठी प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.
या निधीचा वापर येणाऱ्या काळात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासासाठी होईल असं त्यांनी सांगितलं. सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना व संशोधकांना दर्जेदार शिक्षण व सुविधा देण्यासाठी हा निधी खूप मदतगार ठरेल अशी भावना व्यक्त होत आहे. येत्या २० फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या योजनेला सुरुवात करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत