राजधानीसह १२ रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार; ‘या’ एक्स्प्रेस सुसाट.

मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेचे नियमन करणे, सिग्नल आणि अन्य यांत्रिकीकरणासह पायाभूत सुविधा उभारण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह एकूण १२ रेल्वेगाड्यांना ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
या एक्स्प्रेस सूसाट
– २२२२१/२ सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी
– १२१११/२ सीएसएमटी-अमरावती-सीएसएमटी
– १२२८९/९० सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी
– १२८५९/६० हावडा-सीएसएमटी-हावडा
– १२१०५/६ सीएसएमटी-गोंदिया-सीएसएमटी
– १२८०९/१० सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत