केंद्राकडून साखर निर्यातीवर बंदी.

31 ऑक्टोबर 2023 नंतरही देशातून साखरेच्या निर्यातीवर बंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीबाबत मोठी घोषणा केली आहे. यामध्ये कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर यांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
डीजीएफटी अधिसूचनेमध्ये असेही नमूद केले आहे की युरोपियन युनियन आणि अमेरिका या बंदी अंतर्गत येत नाहीत आणि त्यांच्याकडून निर्यात सुरू राहील. इतर सर्व गोष्टी आणि नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. केवळ कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत