राजा जयचंद (जयचंदर, जयचंद्र) हा बुद्धिस्ट राजा होता
प्रा. गंगाधर नाखले
राजा जयचंद (जयचंदर, जयचंद्र) हा बुद्धिस्ट राजा होता म्हणून त्याला इतिहासामध्ये गद्दार म्हटलेले आहे. राजा जयचंद बुद्धिस्ट असल्याचा पुरातत्त्विक विभागाचा पुरावा खाली दिलेला आहे.
ज्यांनी खरी आमच्या देशासोबत गद्दारी केली त्यांना कधीही या देशातील इतिहासकारांनी गद्दार म्हटलेले नाही.
आठव्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम यांनी भारतावर आक्रमण केले. त्यावेळी भारतातील ब्राह्मणांनी मोहम्मद बीन काशिमला सहकार्य केले.
भविष्यपुराण मध्ये अकबराला शंकराचार्याच्या गोत्राचा ब्राह्मण भाऊ म्हटले आहे. अकबराला आपला ब्राह्मण भाऊ करून घेऊन येथील ब्राह्मणांनी अकबराला सहकार्य केले.
रामचरित्रमानस हा ग्रंथ लिहिणारे तुलसीदास हे भीक मागून रात्री मस्जिद मध्ये झोपत होते. म्हणजेच अकबर आणि त्यांची मुस्लिम सत्ता याबद्दल त्यांना प्रेम होते.
पुन्हा मुस्लिम सत्तेला खुश करण्यासाठी ब्राह्मणांनी अल्ला उपनिषद लिहिले. अशाप्रकारे या देशातील ब्राह्मणांनी मुस्लिमांची सत्ता मान्य करून तिला सर्वत्र प्रस्थापित केले. असे असताना कुठल्याही इतिहासकाराने यांना कधी गद्दार म्हटले नाही. परंतु राजा जय चंद्र हा बुद्धिस्ट होता, म्हणून इतिहासामध्ये जयचंद याची नोंद गद्दार अशी आहे.
राजा जयचंद त्याला गद्दार का म्हटल्या जाते –
राजा जयचंद याला संयोगिता नावाची मुलगी होती आणि ती पृथ्वीराज चव्हाण या राजाने पळून नेली होती. पृथ्वीराज चव्हाण यांचा सूळ घेण्यासाठी मोहम्मद जयचंद याने मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आक्रमण करण्यास सांगितले. या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होतो. म्हणून ब्राह्मणवादी इतिहासकार राजा जयचंद याला गद्दार म्हणतात.
परंतु काही प्रामाणिक इतिहासकार यांच्या संशोधनानुसार राजा जयचंद याला संयोगिता नावाची मुलगीच नसून संयोजित याचा कुठेही पुरावा मिळत नसल्याचे इतिहासकाराचे मत आहे.
राजा जयचंद बुद्धिस्ट असल्याचा पुरातत्त्विक विभागाचा पुरावा आहे –
सारनाथ येथील उत्खननामध्ये एक अभिलेख(शिलालेख) मिळालेला आहे जो आजही सारनाथ येथील पुरात्विक विभागाच्या संग्रहालयात ठेवलेला आहे. तो लेख 12 शतकातला आहे अशी त्यावर नोंद आहे. भाषा संस्कृत (बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत) आहे. लिपी पाली (नागरी) आहे. या शिलालेखाला कुमार देवी चा सारनाथ अभिलेख(शिलालेख) म्हटल्या जाते.
जयचंद्र यांची दादी कुमार देवी ही बौद्ध होती. सम्राट अशोक तिचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. कुमार देवीने सारनाथ येथे भव्य धम्मचक्र – जिन विहार बांधला होता. हे विहार 9 मजली होते. मधोमध जलकुप(तलाव) होता. स्नानागार (स्विमिंग फुल) होता. हा लंबा 800 मीटर एवढा मोठा परिसर होता.
कुमार देवी ने 9 मजली बौद्ध विहार बांधला होता या गोष्टीची नोंद या अभिलेखांमध्ये सर्व काही विस्ताराने लिहिलेली आहे. जे लोक असे म्हणतात की सम्राट अशोकाचे नाव भारताच्या भूमीतून नष्ट केले होते, अशा लोकांनी हा अभिलेख वाचलाच पाहिजे.12 व्या शतकातील हा अभिलेख स्पष्टपणे घोषणा करतो (डंके की चोट पर) की सम्राट अशोक एक हजार वर्षापेक्षाही अधिक काळापर्यंत सम्राट अशोक यांचे नांव भारतीय लोकांच्या स्मरणात होते,त्यांच्या हृदयात त्याला महत्त्वाचे स्थान होते.
अभिलेखामध्ये सम्राट अशोक यांचे नांव वलिहिले आहे. कुमार देवी ही गढवाल घराण्याची (खानदान, कुटुंब, कुळ) राणी होती आणि तिने पुन्हा अशोक राज स्थापित केले होते असे अभिलेखांमध्ये लिहिलेले. आहे.
आज हे गडवाल लोक स्वतःला राजपूत ,क्षत्रिय,हिंदू म्हणतात. परंतु खऱ्या अर्थाने ते मूळचे बुद्धिस्ट आहेत. यांनी कधीही धर्म परिवर्तन केला नाही परंतु स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणवाद्यांनी मोठ्या चलाखीने यांना हिंदू बनविले. आज हे आपला गौरवशाली इतिहास विसरलेले आहेत. यांना यांचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा हाच माझा या लेखा मागचा उद्देश आहे.
प्रा. गंगाधर नाखले
25/07/2024
9764688712,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत