येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीचे सर्व गट एकत्रित होऊन निवडणूक लढवावी
अनिरुद्ध शेवाळे
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीचे सर्व गट एकत्रित होऊन निवडणूक लढवावी ज्या क्षेत्रात ज्या पक्षाचे कार्यकर्ते जास्त तिथे सर्व पक्ष त्यांना मिळून मतदान करावे मते फुटू द्यायचे नाहीत ज्याप्रमाणे ब्राम्हण भाजपा, ओबीसी काँग्रेस कमळ,पंजा शिवाय मतदान कुणालाही करीत नाहीत मांग महाराला ते अजिबात मतदान करीत नाहीत ते त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर मतदान करतात तोच स्वाभिमान निष्ठा आपण बाळगावी समाजासाठी अभ्यासपूर्ण जे सदनात आवाज उठविणारे आहेत त्यांनाच उमेदवार बनवावे डॉ बाबासाहेब आंबेडकर एक त्यांचे विचार करत नेक मग आपण सुद्धा नेक एक होऊन सदनात गेल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही जो नेता हेकडी करेल ऐकणार नाही त्याच्या पक्षाला गावातून मोहलल्यातून समाजाने मतदान करायचेच नाही.
समाजाने त्याची जागा त्याला दाखऊन द्यायची कारण समाजाला हेकडी करणाऱ्या गर्विष्ठ घमेंडी मीच बरोबर मिच मोठा म्हणनाऱ्या नेत्याची आवश्यकता नाही आता नेत्यांना समाजाची मतदारांची आवश्यकता आहे जो नेता स्वेंमघोशीत आंबेडकरवादी जयभीम स्वतःला म्हणतो त्यांनी समाजात यावे समाजाला त्यानेत्याजवळ जायची आवश्यकता नाही जे प्रस्थापित परंपरावादी घराणेशाहीची पारिवारिक काँग्रेसी भाजपा वाले जातीवादी अंधश्रद्धाळू राजकारणी आहेत त्यांना आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील मतदारांनी मतदान करू नये आपली शक्ती निर्माण करावी त्यामुळे ज्यांना आपली आंबेडकरी शक्तीची गरज आहे ते आपल्याकडे येतील.
जसे मां .कांशीराम साहेबांच्या मागे धावत होते ती ताकत आता निर्माण क्रा खूप पैसा उधळून फॉर्म भरायला हेलिकॉप्टरने जाऊन मते मिळत नाही तेवढेच पैसे समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी गरीब समजघतकांसाठी खर्च करा वसतिगृह काढा खेड्यातील विद्यार्थ्यांना शरा द्या आता या विषयावर बोलायला एकही आमदार खासदार मंत्री सदनात नाही फक्त आता युपी मधून चंद्रशेखर आझाद एकटेच पोहचले मते घ्यासाठी जयभीम म्हणणारे खूप आहेत पण आंबेडकरी समाजाला न्याय देणारे बोलणारे कुणीच नाहीत या सर्व बाबींचा विचार करा वेळ गमउ नका मनुवादी सैतानी व्यवस्थेच्या विरोधात फक्त आंबेडकरी चळवळीचे वैचारिक मतदार आहेत त्याशिवाय कुणीच नाही
अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत 982336832,9146867692
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत