विमान उड्डान हाेताना काेसळले पायलटवर उपचार सुरू….
१९ प्रवाशापैकी १८ प्रवाशांचा मृत्यू,
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे.
या विमानात १९ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना अपघात झाला.
हे विमान पोखराला जात असताना सकाळी अकराच्या सुमारास विमानाला अपघात झाला.
शौर्य एअरलाइन्सच्या विमान क्रमांक MP CRJ 200 ने रनवे २ वरून पोखरा येथे उड्डाण केले,
परंतु तांत्रिक बिघाडामुळे, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आग लागली आणि प्रचंड धुराचे लोट पसरले.
अपघातानंतर संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाला.
शौर्य विमानात एकूण १९ जण होते,
यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे,
तर पायलटवर उपचार सुरू आहेत.
टी.आय.ए.चे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, विमानातील कर्मचाऱ्यांसह १९ जण पोखरा येथे जाणाऱ्या विमानात होते.
सकाळी अकराच्या सुमारास विमान कोसळले.
अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
तर विमानाचे कॅप्टन एम. आर. शाक्य यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत