जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी
जन्म – २५ जुलै १९७८ (इंग्लंड)
लुईस ब्राऊन हि ‘आयव्हीएफ’ (IVF) या तंत्राचा उपयोग करून जन्माला आलेली पहिली मानव टेस्टट्यूब बेबी आहे. स्टेप्टो, पॅट्रिक ख्रिस्तोफर ब्रिटिश प्रसूतितज्ञ व स्त्रीरोगतज्ञ यांनी ब्रिटिश वैद्यकीय संशोधक रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या बरोबर परीक्षानलिके मध्ये (टेस्ट-ट्यूब) मानवी अंड आणि शुक्राणू यांचा संयोग (फलन) घडवून व भ्रूणाचे गर्भाशयात स्थलांतर करून जीवनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग केला. या तंत्राचा वापर केल्यामुळे जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी (परीक्षा नलिका बालक) लुईस ब्राउन हिचा जन्म २५ जुलै १९७८ रोजी इंग्लंड येथे झाला. या संशोधनाकरिता रॉबर्ट एडवर्ड्स यांनाच २०१० सालचे वैद्यक वा शरीरक्रिया विज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९६७ मध्ये त्यांनी लॅपरोस्कोपी इन गायनॅकॉलॉजी हे पुस्तक प्रसिद्ध केले. लॅपरोस्कोप ही प्रकाशतंतूंनी तयार केलेली अरुंद नलिका असते. स्टेप्टो यांनी वंध्यत्व विकारातील कमी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करिता लॅपरोस्कोपी या तंत्राचा यशस्वी वापर केला. स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक कारण गर्भाशयाला जोडलेल्या अंडवाहिनी (फॅलोपियन) नलिका मध्ये अवरोध निर्माण होणे हे असू शकते. त्यामुळे अंड या नलिकेत प्रवेश करू शकत नाही व त्याचे शुक्राणूशी फलन होत नाही. अशा परिस्थितीत शरीरबाह्य फलन घडवून तयार झालेला भ्रूण प्राथमिक अवस्थेत असताना परत गर्भाशयात ठेवण्याची कल्पना स्टेप्टो यांनी प्रथम मांडली. एडवर्ड्स यांनी शरीरबाह्य फलन घडवून आणण्याच्या संशोधनात स्टेप्टो यांना मदत केली. स्टेप्टो आणि एडवर्ड्स यांनी लिहिलेल्या ए मॅटर ऑफ लाइफ : द स्टोरी ऑफ ए मेडिकल ब्रेकथ्रू (१९८०) या पुस्तकात शरीरबाह्य फलनाशी संबंधित त्यांच्या शोधांचा तपशील दिलेला आहे.
https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत