१९९३ च्या भूकंपातील शैक्षणिक रोपाचे संस्कार रुपी वटवृक्ष झाले .
नळदुर्ग येथील धरित्री विद्यालय एक शैक्षणिक प्रेरणा देण्याचे साधन : – भिमराव मोरे
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ च्या महा प्रयलकारी भूकंपा नंतर नळदुर्ग आलियाबाद येथे अनाथ मुलांना आधार मिळावा म्हणून “आपलं घर ” नावाचे ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शैक्षणिक रोपटे लावले त्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले हे आम्हाला अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे नळदृग से आपलं घर येथील शिक्षण प्रेरणादायी आहे असे परखड मत भीमराव मोरे यांनी व्यक्त केले
दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला यावेळेस ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा तर प्रमुख अतिथी म्हणून महादेव आप्पा नरे गुरुजी,श्रीहरी जाधव,संगीता शहा उपस्थित होत्या. ज्ञानदीप कलो पासक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष भीमराव मोरे, सचिव ॲड सयाजी शिंदे,कोषाध्यक्ष मल्लिनाथ माळगे,सहसचिव वसंतराव रामदासी, सदस्य किरण पाटील,सदस्या नीताताई पाटील उपस्थित होत्या.तसेच अजित चव्हाण,सतीश भोसले,क्षीरसागर नेताजी,कमलाकर चव्हाण,दीपक शिंदे,आपले घरचे व्यवस्थापक विलास वकील उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते झाले.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी या भारतवासी सारे या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.सर्व मान्यवरांचा सत्कार शाल,पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी केले. प्रास्ताविक करताना त्यांनी दहावीचा निकाल,विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेचे प्रयत्न,पालकांची भूमिका, विद्यार्थ्यांचे सहकार्य या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, शाल, प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यामध्ये इयत्ता दहावी मधील सुदर्शन घोडके, तन्वी पवार, सक्षम पाटील, माधुरी बिराजदार ,संस्कृती दळवे,प्रेरणा कांबळे,पंकज कदम, नम्रता कोकणे, मयुरी घोडके, दीक्षा लोंढे, रेहान शेख,सोहेल सुतार यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी सुरज कांबळे याने स्वखर्चाने दहावी मधील प्रथम तीन क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रजिस्टर,गुलाब पुष्प देऊन गौरव केला. शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये ए ग्रेड मिळवलेल्या संस्कृती कदम, अनिरुद्ध मोरे, ज्ञानेश्वर माळी या विद्यार्थ्यांचाही गोल्ड, सिल्वर व ब्रांझ मेडल, सर्टिफिकेट व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांची गवळी व सुरज कांबळे हे माजी विद्यार्थी विना मोबदला शाळेत मुलांना गणित व विज्ञान या विषयांचे मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांचाही सत्कार शाल, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी आत्तापर्यंत ७९ वेळा रक्तदान केले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेदिवशी त्यांनी ८० वे रक्तदान पुण्यामध्ये केले. त्यांच्या या कार्याची माहिती सर्वांना कळावी व इतरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार शाल,पुस्तक,गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
कमलाकर चव्हाण यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद या स्वातंत्र्य वीरांच्या कार्याचा उल्लेख करत त्याची सांगड आजच्या विद्यार्थ्यांनी कशी घालावी हे सांगितले
इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन असेच यश संपादन करावे असे सांगितले . गुणवत्तेबरोबर माणुसकीची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी असे विद्यार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कारंजे यांनी केले.आभार जगताप गोरख यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत