आळस सोडा ; समाज जोडा..
होय स्वातंत्र्य पासून मुस्लिम समाजाने इंग्रजांच्या गुलामीतून भारतीय नागरिक म्हणून खांद्याला खांदा लावुन लढा दिला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रेश्मी रुमाल धार्मिक धर्म गूरू यांनी चळवळ चालवली आपल्या कुटुबंयांची कधीही तमा बाळगली नाही इमाने इतबारे भारतीय नागरिक म्हणून देशासाठी मुस्लिम क्रांतिकारी यांनी प्राण दिले पण ते इतिहासकार लेखनी तुन मांडत नाहीत तर प्रसिध्दी माध्यम ही मुस्लिम समुदाय व समस्या यावर धारदार लेखनी चालवत नाहीत पण आरोपीच्या पिंज-यात मात्र मुस्लिम समाजाला व मुस्लिम म्हणून उभे केले जाते आज ही देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणूकीत सकाळी सहा वाजल्या पासून ते संध्याकाळी शेवटची व्यक्ती हि मुस्लिमच होती हे नाकारता येणार नाही रांगाच्या रांगा लावुन न मागता इंडिया आघाडीला मतदान केले
पण महाराष्ट्र राज्यात मुस्लिम खासदार एक ही नाही कींवा विधानपरिषदेला एक ही आमदार नाही एवढी लाचारी स्विकारावी लागत आहे मुस्लिम मतदाता मत देऊ शकतो मग मत मागण्याचा अधिकार नाही का? पण प्रस्तावित व राजकीय पक्ष व राजकीय नेते हे मुस्लिम समाजाला केवळ निवडणूकीतच किंमत देताहेत व नंतर पुन्हा पाच वर्ष त्यांच्या समस्या व प्रश्न याकडे काहीच देणेघणे नाही कारण की समाजातील बगल बच्चे समाजावर लादलेले हे अगोदरच तोंडसुख बोलत सुटतात ( सहाब उसका क्या खरा है ) सहाब को खुश करना और अपनी संस्था, गुत्तेदारी चलाना बस रोटी और बोटी पर बिकवाना हे काम होत असल्याने आज मुस्लिम १४% महाराष्ट्र राज्यात असून ही नेतृत्व नाही की दिशा नाही कधी धर्म तर कधी आर्थिक परस्थीती ने आज मुस्लिम समुदाय केवळ आपले कुटुबं व घर यातच मग्न आहे कारण की शिक्षीत कमी आणी साहेबांचे गुणगान गानारा जास्त यातच मग्न आहे असो पण उद्याचे युवकांचे भवितव्य काय ?
पानटपरी, चहाचे दुकान, गॅरेज, भंगार, केळीचा गाडा, भज्याचा गाडा, मॅकानिक, छोटा व्यवसाय व कुटुबं मुस्लिम नवयुवक आज आपल्या जिवनात नैराश्याचे जिवन जगत आहे व्यवसायातुन जर एखाद्या बाबतीतही चूक झाली की त्याला बदनाम करण्यासाठी राजकीय नेता पोटांच्या बेंबी पासून आरडा ओरड करतो तो ही प्रसिद्धी माध्यमातून मग एकाची चुक झाली म्हणजे समाजच आरोपी कसा हे मुस्लिम समाजाच्या रक्तात नाही आज नको तशी उगीच बदनामी कोणत्याही नेत्याला मुस्लिम विरोधी गरळ ओकल्याशिवाय नेता होतंच येत नाही कारण की त्यांच्या जिवनात मुस्लिम विरोधी वक्तव्य हेच भांडवल होय पण याला जवाबदार ही मुस्लिमच आहेत कारण नगर परिषद सदस्य ते नगराध्यक्ष / महापौर एवढीच मर्यीदा त्यांच्या पलीकडे जावूच शकत नाहीत त्यामागे कारण ही तसेच आहे मुस्लिम मतदान करण्यासाठी जन्माला आला मतदान मागण्यासाठी नाही हाच संदेश डोक्यात ठेवल्याने तो लोकसभा सदस्य कींवा विधानसभा सदस्य होण्यासाठी तयारच नसतो एक उभा राहीला की लगेंच त्याच्या विरोधात दुसरा उभा राहणार हे निश्चित म्हणून आज लोकसभा सदस्य कींवा विधानसभा सदस्य म्हणून मुस्लिम सदस्य कमी निवडणूकीत जिंकून येताहेत जर मुस्लिम खासदार व आमदार निवडणूकीत जिंकून गेले तर मुस्लिम समस्या व प्रश्न उपस्थित करु शकतील सदस्य नसल्याने कट्यावरील गप्पातच मग्न राहतील महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत मराठा , ओबीसी, धनगर , यांचे आरक्षण वरुन आंदोलन चालू आहेत तर सत्ताधारी भाजपा , शिवसेना ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट)
राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजीत पवार गट) हे विधानसभेची बांधनी करताहेत तर कांग्रेस,
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी (शरद चन्द्र पवार गट) हे तयारीत आहेत, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूकीत उतरणार, एम आय एम ही स्वबळावर, जरांगे पाटिल २८८ मतदारसंघ स्वबळावर, समाजवादी ३७ खासदार घेऊन महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत मग मुस्लिम मतदान काय करणार व कोठे जाणार का मताची विभागणी होणार यावर मुस्लिम मतदान काय भुमिका घेते यावर बरंच काही अवलंबून आहे कारण मुस्लिम आमदार जास्तीत जास्त निवडणूकीत उभे राहुन जिंकून यावेत ही कोणत्याही पक्षाची विचारधारा नाही यासाठी आता एकजुटता ठेवून दलित – मुस्लिम जर महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत एका विचारांने सक्षम भक्कम जर विधानसभा निवडणूकीत उभे राहिले व निवडून आले तर अशा घटना होणार नाहीत जी आज महाराष्ट्र राज्यात परिस्थीती उद्भवली त्याला जवाबदार कोण ?
विशाळगड हिंसाचाराला जबाबदार कोण ? तसे पाहता
शिव छत्रपती,राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र या नांवलौकिकाला विशाळगडा च्या हिंसाचाराने गालबोट लावले गेले आहे…पण या निमित्ताने काही प्रश्न आमच्या समोर उभे आहेत…
त्या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास “कुठं पाणी मुरतंय ” याचा उलगडा होण्यास मदत होईल..
मुळात विशाळगडा वरील अतिक्रमणे ही निघाली पाहिजेत या बद्दल दुमत नाहीं..पण एकूण १०६ अतिक्रमणे आहेत त्या पैकी ७ ते ८ केसेस न्यायप्रविष्ठ आहेत उर्वरित अतिक्रमणे सरकारला काढायला काहीच अडचण नव्हती आणि तसा टोकाचा विरोध ही नव्हता पण तशी कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजे छत्रपती आणि शिवभक्त आक्रमक झाले मग ही चूक प्रशासनाची /सरकारचीच मानली पाहिजे.
सदर घटनेची पूर्व कल्पना सरकारी यंत्रणेला होती..
मग बंदोबस्त करण्यात ढिलाई का दिली गेली ? का या मागे सरकारी षढयंत्र तर नाही ना..?अतिक्रमणे वेळेत निघाली नाहीत या निमित्ताने संभाजीराजे व त्यांचे शिवभक्त कार्यकर्ते अतिक्रमणे काढण्याच्या भूमिकेवर आक्रमक झाले. अतिक्रमणाच्या आडून यांना फक्त आणि फक्त मुस्लिम समाज टार्गेट करायचाछ होता..का.? असा प्रश्न उभा आहे अतिक्रमणे निघाली पाहिजेत इथंपर्यंत ठीक आहे..
पण विशाळगडा च्या मागे ३ किमी वर असलेल्या गजापूर या गावात अतिक्रमणांचा काही विषय नसताना जमवाकडून अत्यन्त क्रूरपणे मुस्लिम लोकांची घरे पेटवने, उध्वस्त करणे, मारहाण करणे, घरातील साहित्य अस्ताव्यस्त करणे, गाड्या फोडणे हे असले घृणास्पद कृत्य आंदोलकांनी केले..अक्षरशः चिमुरड्या पोरांना सोडलं नाहीं..स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या शिवभक्तांनी अक्षरशः माणुसकीला काळिमा फासला अतिक्रमण काढायला विरोध नाहीं..पण त्या आडून मुस्लिम समाजातील लोकांवर राजेंच्या नेतृत्वात अत्याचार झाला. त्या गजापूरकर मुस्लिमांचा दोष काय ?
पुणे, मुंबई, सांगली इथून गाड्या च्या गाड्या भरून आल्या यावरून पुढं काय होणार यांची संभाजीराजे छत्रपती यांना कल्पना का आली नसेल का? मुद्दाम घुम्याचं सोंग घेतलं गेलं.?
या बाबत विशाळगड मुक्ती आंदोलनाचे प्रमुख पुढारी म्हणून संभाजीराजे उत्तर देतील का.. ? मनात आणलं असतं तर छातीची ढाल करून संभाजीराजे छत्रपती स्वतः हा हिंसाचार चुटकी सरशी थांबवू शकले असते..हिंसाचाराचा आगडोंब उसळल्यावर संभाजीराजे छत्रपती का गप्प बसले..? जमावाला शांत करणं राजेंच्या साठी अवघड नव्हतेच..पण पुरोगामी राजर्षी शाहू महाराजांचा वसा अन वारसा सांगणाऱ्या संभाजीराजे यांच्या कडून अशी कुठलीही कृती झाली नाहीं.. याचा अर्थ काय? का या हिंसाचाराला त्यांची मुक संमती होती.? याचा खुलासा झालाच पाहिजे.! त्याच सोबत संभाजीराजेंनी विशाळगडावर कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ ६ दिवस मुक्कामी होता..असा आरोप केलाय! कोणत्याही विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुस्लिम समाजावर दहशतवादाचा आरोप करण्याची ही जुनी संघी टेक्निक आहे. संभाजीराजांना जर याबद्दल माहिती असेल तर त्यांनी आतापर्यंत ही माहिती तपास यंत्रणांना का दिली नाही त्यांनी ही माहिती लपवली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. विशाळगडावर किल्ला परिसर व दर्गा यात ७०० मीटर चे अंतर आहे ११ ते १४ शतकातील हा दर्गा असल्याच्या इतिहासात नोंदी सापडतात..जेव्हा विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता तरी त्यांनी कधी रेहान मलिक बाबांच्या धक्का लावला नाहीं..म्हणजे नक्कीच तो अलीकडच्या काळात झालेला नाहीं..फक्त पूर्वी तो कौलारू छपरात होता आता श्रद्धेपोटी त्याचा जीर्णोद्धार केलाय इतकंच म्हणावं लागेल..अर्थात त्याचा मुस्लिम धर्म उदात्तीकरणा विषयी दुरान्वये संबंध नाहीं..तिथं जाऊन नतमस्तक होण्यात मुस्लिम कमी आहेत अन हिंदूच जास्त आहेत. हे वास्तव आहे !
मुस्लिम कुटुंबावर कार्यकर्ते चाल करून गेले हे संभाजीराजे थांबवू शकत नव्हते का ? त्यांची मुक संमती होती.? प्रशासनाने त्यावेळी कडक पावले का उचलली नाहीत.? का प्रशासनाने बघ्याची भूमिका घेण्यामागे काही राजकीय षढयंत्र होते का ? याचा उलगडा झालाच पाहिजे..आणि यासाठी तटस्थ पणे काम करणाऱ्या माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटलांच्या सारख्या निष्पक्ष व्यक्तीचा सहभाग असणारी सर्वधर्मातील सुज्ञ व्यक्तींचा समावेश असणारी समिती गठीत होऊन याची चौकशी झाली पाहिजे व दोषीवर कारवाई झालीच पाहिजे..
संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विशाळगड मुक्ती संग्रामातील कार्यकर्त्यावर गुन्हे आता दाखल झालेत.. या लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणुन संभाजी राजे पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसले होते.
तर दुसरीकडे संभाजीराजाचे पिताजी व कॉंग्रेस चे खासदार शाहु महाराज पीडितांना भेटून अश्रु ढाळत होते.! शाहु महाराज अश्रु ढळण्या एवढे अगतिक का झालेत ? ते खासदार आहेत, समृध्द वारसा असणाऱ्या घरातील आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी ते ठाण मांडून बसु शकत नाहीत का ?
गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात झालेल्या पुसेसावळी दंगलीत किती कारवाई झाली.? हे पण एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री फडणवीसांनी जाहीर करावं..
मुस्लिम धर्मातील कुटुंबावरील झालेले हल्ले माणुसकीला काळिमा फासणारा हिंसाचार सामाजिक अखंडतेच्या दृष्टीने अत्यन्त घातक आहे..यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थिती वर सुद्धा अपरिहार्य परिणाम होणार आहे एवढे मात्र निश्चित पण आजचा युवक हा राजकीय पक्ष व राजकीय नेता आपल्या स्वार्थीसाठी युवकांचे डोके भडकाऊ पाहत आहे या पासून सावध राहणे गरजेंच आहे आगामी विधानसभा निवडणूकीत काहीही होऊ शकते कारण राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे यासाठी मुस्लिम आमदार म्हणून निवडणूकीत निवडून येणे गरजेंच आहे होणार अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आळस सोडा ; समाज जोडा..
अशी प्रतिक्रिया युवकामध्ये व्यक्त होत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत