मुख्य पान

महामानव , युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड मानवतेचा आणि कारुण्यतेचा अभ्यास करा.

धर्मभुषण बागुल


बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत.खऱ्या अर्थाने ते राष्ट्र नायक आहेत.त्यांना जातीच्या संकुचित वर्तुळातून बाहेर काढा.

मित्रांनो ,
राष्ट्रनायक बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ , त्यांनी केलेला संघर्ष , त्यांनी केलेले राष्ट्रव्यापी महान कार्य , संविधानाची निर्मिती , लोकशाही व्यवस्थेसाठी खंबीर भूमिका , सर्वासाठी स्वातंत्र्य , सर्वांना समान न्याय , सर्वांना समतेची वागणूक , सर्वांसाठी सर्वांनी पाळावयाचा बंधुभाव, महिलांसाठी दिलेले स्वातंत्र्य ,शिक्षण आणि सर्व हक्क….या सर्व गोष्टी मानवतेसाठी , देशाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे देशाचे नागरिक खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सुखी होणार आहेत.
परंतु त्यांचे हे महान कार्य ,पवित्र विचार भारतातील वेगवेगळ्या जातीत विभागलेल्या लोकांनी समजून घेतलेले नाही. अद्याप देखील असंख्य लोकांना बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती दिली गेली आहे.त्यांच्या बद्दल अपप्रचार केला गेला आहे.गैरसमज पसरविण्यात आलेले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त देशासाठी , देशातील प्रत्येक नागरिकांसाठी , देशातील प्रत्येक जाती समुहासाठी त्यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी प्रचंड महान कार्य करून ठेवले आहे. परंतु कोणीही याचा सूक्ष्म अभ्यास करीत नाहीत. त्यांचे पुस्तक , त्यांचे लेख , लिखाण , विचार वाचत नाही.काही लोकांनी वाचले , त्यांना त्यात त्यांच्या जाती आणि वर्ण वर्चस्वाला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले. आणि कट कारस्थान करून त्यांनी हे विचार लोकांपर्यंत पोहचू नये यासाठी कट कारस्थान केले.
बाबासाहेब फक्त दलितांचे कैवारी आहेत.फक्त महार मांगाचे कैवारी आहेत , फक्त बौद्धांचे उद्धारकर्ते आहेत. हिंदूंचे विरोधक आहेत.त्यांनी फक्त एका जातीसाठी कार्य केले. अशा विविध पद्धतीचे अपप्रचार करून बाबासाहेबांची बदनामी करण्यात आली.
प्रस्थापित वर्गाने या महापुरूषाबाबत प्रचंड गैरसमज पसरविले आणि अज्ञानी , अडाणी, भोळसट वृत्ती चे करोडो भारतीय लोक त्यांच्या या षडयंत्राला बळी पडले.
अशा कारस्थानामुळे संपूर्ण देशासाठी महान कार्य करणारे , मानवतावादी विचारांचा , लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार आणि निर्माण करणारे हे महामानव फक्त एका जातीचे उद्धारकर्ते,एक समूहाचे कैवारी म्हणून देशापुढे त्यांचे संकुचित आणि चुकीचे व्यक्तिमत्व पुढे करण्यात आले. थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती देशात आणि आपल्या आजूबाजूच्या समाजात बघायला आणि अनुभवायला मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला , कार्याला छोटे दाखविण्याचे चुकीच्या कामाला प्रस्थापितांनी सुरुवात केली.आणि सर्व जाती समूहाच्या लोकांचा त्यात हातभार लागला.हे मान्य करावेच लागेल.
उदाहरणार्थ , दिवसरात्र जयभीम बोलणाऱ्या बौद्धांना असे वाटते की बाबासाहेब आमचेच आहेत. कारण दुसऱ्या जातींना त्यांच्याबद्दल उपकाराची आणि श्रद्धेची भावना नाही असे ते मानतात.तसे वारंवार दिसून ही येते. मग त्यांच्यातर्फे बाबासाहेबांचे जातीय वर्तुळापुरते कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात इतर समाजाला टाळले जाते. इतर लोक देखील सहभागी होण्यास फारसे उत्सुक नसतात. अशा रीतीने गैरसमज आणि दुरावा निर्माण होतो आणि वाढत जातो.
शेकडो वर्षापासून ऊपेक्षित आणि गावकुसाच्या बाहेर अतिशय वाईट अवस्थेत जगणाऱ्या एससी आणि एसटी कॅटेगिरीचे देशात 2000 पेक्षा जास्त जाती आहेत. महाराष्ट्रात त्यातील शंभर पेक्षा जास्त जाती आहेत. त्यांना बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून , सांविधानिक तरतुदी करून देशाच्या सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक प्रवाहात आणण्याची आणि येण्याची संधी निर्माण करून दिली आहे. तरी देखील त्यांच्या 99 टक्के लोकांना मनात बाबासाहेबांबद्दल खूप चांगली भावना आहे असे दिसून येत नाही.
बाबासाहेबांनी सुमारे 4000 चे जवळपास ओबीसी जातींना आरक्षण आणि विशेष तरतुदी संविधानात करून ठेवल्या आहेत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना याबाबत खूप विरोध केला.त्रास दिला.अपमानास्पद वागणूक दिली.तरीही बाबासाहेबांनी माघार घेतली नाही.आज ओबीसी जातींना जो विशेष दर्जा आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आहे.तरी ही ओबीसी समाज या महापुरुषाच्या विचारांना स्वीकारत नाही.ज्यांनी हजारो वर्षे द्वेष केला त्याच कर्मठ ,सनातनी आणि सडक्या व्यवस्थेला , बुरसटलेल्या जाती व्यवस्थेला ते आपले मानतात.
एकूणच बौद्ध , एससी , एसटी, एन टी,ओबीसी वर्गाचे हे वागणे त्यांच्याच हितासाठी , त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी अतिशय घातक आहे. ते पुन्हा सर्वंनाशाच्या मार्गाने निघाले आहेत त्यांना स्वातंत्र्य , समता ,बंधुता आणि न्याय हे मानवी जीवनाचे जागतिक दर्जाचे तत्त्वज्ञान समजले नाही…..आणि हे तत्त्वज्ञान आधुनिक भारतात निर्माण करू पाहणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर देखील समजलेच नाहीत…असेच म्हणावे लागेल.
बौद्ध , एससी, एसटी, एन टी आणि ओबीसी समूहाचे हे मोठे दुर्दैव आहे.
(भारतीय महिला वर्गाच्या कृतघ्नतेबद्दल मी स्वतंत्र लिहिणार आहे.)

आपला
धर्मभुषण बागुल
राज्याध्यक्ष
समता सैनिक दल
9921323281

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!