महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
बारदाणा : वर्तमान ग्रामवस्तवाचा कथामय वेध-डॉ.अनंत दा. राऊत
'बारदाणा' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या संजय जगताप यांच्या कथासंग्रहाचे मी स्वागत करतो. जीवनातील एखाद्या खोल परिणाम करणाऱ्या अविस्मरणीय घटनेचे चित्रण करणे हा कथा या वाङ्मय प्रकाराचा स्थायीभाव असतो. 'बारदाना' या कथासंग्रहातील कथा ग्रामीणांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग जिवंतपणे उभे करते. वर्तमान ग्रामीण वास्तवाचे चित्रण करते. शेतीत राबून गुजरान करणाऱ्या खेड्यातील लोकांचे दैन्य दारिद्र्य आजही कसे संपलेले नाही, याचा जिवंत प्रत्यय देते. ग्रामीण भागातून शिकून पुढे आलेल्या नव्या पिढीची इथल्या भ्रष्ट व्यवस्थेत कशी फरपट होते याचा प्रत्यय देते. ग्रामीणांच्या जीवनातील कौटुंबिक,सामाजिक,राजकीय पातळीवरील संघर्ष उभा करते.अस्मानी व सुलतानी संकटात इतिहास काळापासून शेतकऱ्याची चाललेली ससेहोलपट आजही आपण कसे काय थांबवू शकलो नाही? हा गंभीर प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण करते. ज्याच्या कष्टामुळे रोज आपल्यासमोर जेवणाचे भरलेले ताट येते त्या बळीराजाच्या संदर्भात वर्तमान प्रस्थापित समाज आणि शासनकर्ते किती बेफिकीर आहेत याची जाणीव या संग्रहातील कथा वाचून होते.
आवश्यक तिथे अस्सल ग्रामीण बोलीचा वापर, संवादात्मकता, काही व्यक्तिरेखांचे ठसठशीत चित्रण, आवश्यक तिथे नेमक्या प्रतिमांचा वापर ही या कथा संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
सदर संग्रहातील बारदाणा,मो-बाईल येडं,बोळवण,कमळीच्या कळा,सुरुंग,पळसाला पाने तीनच,सपन,सुलानामा,निवडणूक,मोतिबिंदू,
चिखल,पुनर्गठण,झुकलेला घड,हापसा,छबीना,
झड,गुत्तं,डोरलं अशा अठरा कथांचा समावेश असलेला हा कथासंग्रह वर्तमान ग्रामवस्तवातील दुःख कष्ट आणि बदलते संदर्भ समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावयास हवा.
बारदाना
(कथासंग्रह)
संजय जगताप
शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर
पृष्ठ संख्या १३६
किंमत २४०
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत