देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

धम्मचक्र प्रवर्तन की प्रथम धम्मदिक्षा बाबत खरे मत………. ( भगवान बुध्दाची धम्मदेशना )

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर

प्रवर्तन – प्रवर्तक – आरंभ , सुरुवात, ही सुरुवात करणारा म्हणजे प्रवर्तक….

हे दोन्ही शब्द म्हणजे प्रवर्तन – प्रवर्तक एकमेकासाठी पूरक आहेत.ते वेगळे होतं नाही. बुध्दाने आपल्या सिद्धांताची स्थापना केली. म्हणूनच ते प्रवर्तक मानले जातात. दुसरा कोणीही नाही. पण त्यांनी आपल्या सिद्धांताला बौद्ध धम्म म्हटले नाही. मध्यम मार्ग म्हटले आहे. आणि तोच मध्यम मार्ग जगात ” बौद्ध धर्म ” म्हणून मानला जातो. आणि प्रचलित झाला आहे. यावरून हे सिद्ध होते की , बुद्ध हेच बौद्ध धम्माचे प्रवर्तक आहे दुसरा कोणीही असू शकत नाही.

पण खरी गोम आहे ती आपण उपस्थित केलेला प्रश्न धम्मचक्र प्रवर्तन ह्या शब्दाची !  
 धम्म प्रवर्तन ह्या दोन शब्दामध्ये चक्र ( पाली भाषेत चक्क ) जोडून आपण सर्वजण विनाकारण चक्कर काटत आहोत.मग हा शब्द कोणी आणि कधी जोडला ? हे समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते , आपण आपल्या मनात प्रश्न , संशय निर्माण करून जिज्ञासुपणाने आणि चौकसपणाने जाणून घेतले पाहिजे तरच आपण सर्वजण समजू शकतो अन्यथा नाही. तर ब्राह्मणांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हा शब्द सिद्धार्थाचा जन्म झाला त्याच वेळी देव  , दिव्यदृष्टी बुद्ध , बत्तीस लक्षण , येंशी ( 80 ) शुभ चिन्ह , सम्यक संबोधी आणि धम्मचक्र प्रवर्तन या शब्दाची निर्मिती केली.

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 7 आणि 8 अनु. क्रं. 2 , 3 आणि पृष्ठ क्रं. 8 अनु. क्रं. 14 आणि 21 आणि पृष्ठ. क्रं. 9 अनु. क्रं. 23, 24, म्हणजे या शब्दाचा निर्माता ब्राह्मण होय. त्याने ही भविष्यवाणी सिद्धार्थला ज्ञान प्राप्ती होणे अगोदरच 35 वर्ष आधीच केली म्हणजे आपणास देव , दिव्यदृष्टी, बत्तीस लक्षणे , येंशी (80) शुभ चिन्ह , सम्यक संबोधी आणि धम्मचक्र प्रवर्तन या शब्दावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले. अशा खुंट्या ब्राह्मणांनी ठोकून ठेवल्या आणि आपण त्यावर चर्चा करण्यात वाया घालतो.

आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की  , धम्मचक्र ह्यात " चक्र  " शब्दाने जोडण्याची काय आवश्यकता होती ?  कारण हिंदू धर्मात श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आहे तर " बुद्धाचे धम्मचक्र" ! म्हणजे बुद्धाच्या धम्माला चक्राची उपमा दिली आहे. बुद्धाने सर्वप्रथम कोणाला धम्म उपदेश देऊ ? असा प्रश्न बुद्धाने स्वतःलाच विचारला तेव्हा त्यांना आलारकालाम आणि उद्दकराम पुत्त दोघेही मृत्यू पावले असे सांगण्यात आले.

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 92 अनु. क्रं. 1 ,2 आणि अनु. क्रं. 3 ते 5

बुद्धाने स्वतः दिव्यदृष्टीने पाहिले नाही. कारण दिव्यदृष्टी अस्तित्वातच नाही. त्यांना सांगण्यात आले. आणि पाच परीव्रजकाची चौकशी केली , तेव्हा त्यांच्या शोधात सारनाथच्या इसइपतन मृगदाय वनाकडे निघाले. यावरून कोणालाही दिव्य दृष्टीने पाहता येत नाही हे सिद्ध होते. कारण दिव्यदृष्टी आहेच नाही. " जेव्हा बुद्ध सारनाथला पोहचले तेव्हा त्या पाच परिव्रजकांनी बुद्धाचे स्वागत केले आणि त्या पाच परिव्रजकांना आपल्या तत्त्वाचा उपदेश दिला. तीच " प्रथम धम्मदीक्षा " होय 

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 92 ते 104.प्रकरण – 1. सारनाथ येथे आगमन ते प्रकरण – 7. एकाग्रतेने सखोल वाचन करावे.

या प्रकरणात कुठेही धम्मचक्र प्रवर्तन असा उल्लेख केलेला नाही.तर त्यात प्रथम धम्मदीक्षा असा उल्लेख केलेला आहे. 

 ज्या पाच परीव्रजकांना धम्मदीक्षा दिली ते कोणत्याही धर्माचे अनुयायी नव्हते. जर त्यांचा धर्म असताना जर बुद्धाने आपल्या तत्त्वाची  ( धम्माची  ) दीक्षा दिली असती तर धर्मांतर म्हणता आले असते. कारण बुद्धाच्या वेळेस जे परीव्रजक होते ती परीव्रजक संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहूनही जुनी आहे ते पहा  - 

बौद्ध भिक्खु हा मुख्यतः परीव्रजक असे. ही संस्था बौद्ध भिक्खूच्या संस्थेहून जुनी आहे

प्राचीन परीव्रजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तत: परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय 

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 399 अनु. क्रं.3 आणि 4.

 उपरोक्त माहितीनुसार सारांश रूपाने बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केले नसून त्यांना धम्मदिक्षा दिली. परंतु बुद्ध स्वतः धम्म प्रवर्तक होते. यात काही शंका नाही. कारण त्यांनी स्वनिर्मित तत्त्वांची  ( धम्माची  ) स्थापना केली.धम्मचक्र प्रवर्तन "  हा शब्द बुद्धाच्या निर्वाणानंतर चारशे वर्षांनी लिहिलेल्या ग्रंथात घुसाडल्या गेला आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!