महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण भूमिका ,,, ओबीसी आरक्षणाचा पेच ,,, आणि या मागील वास्तव ,,,,,,,!

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213

मराठा समाजाचे कुणबी पण मान्य करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी हळू हळू जोर धरू लागली आणि या आरक्षण लढाईला सर्वाधिक बळ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंतर वाली सराटी मधून सुरू केलेल्या उपोषण ते आजवरच्या लढाईतून प्राप्त झाले आहे .
मधल्या काळातील कांहीं असंसदीय व हिंसक घटना ची काळी किनार या आंदोलनाला आहे , तशीच ती शासन कर्त्या वर्गा द्वारे झालेल्या लाठीमारात ही आहे .
या आंदोलनाला प्रतिक्रिया म्हणून कांहीं वाद विवाद समोर आले , ओबीसी आरक्षण बचाव याचा ही मुद्दा आला , आणि थेट राजकारण यात घुसून कांहीं वर्ग हा महा विकास आघाडी चे बाजूने तर कांहीं वर्ग हा थेट भाजपा चे ही समर्थनार्थ उतरला .
इतकेच नाही तर मराठा आरक्षण न मिळण्या मागे 1994चां महाराष्ट्र शासनाचा जी आर कारणीभूत आहे व त्यास तत्कालीन मुख्यमंत्री शरद चंद्र जी पवार साहेब असे ही आरोप करण्यात आले .
पवार साहेबांनी सहकार सम्राट आणि श्रीमंत मराठा वर्गा साठीच राजकारण केले आणि गरीब व गरजवंत मराठा समाजाचा फक्त वापर केला असे ही आरोप करण्यात आले .
या सर्व पार्श्वभूमीवर आपणास सर्वच बाबीचा विचार मर्यादित लेखात करता येणे अशक्य प्राय आहे .
पण याच्या मुळाशी गेल्या नंतर एक बाब स्पष्ट होते की ,
मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा पूर्णतः गैरवाजवी व चुकीचा नाही
धनंजय कीर यांचे महात्मा जोतिराव फुले नावाचे पुस्तक आहे , आणि हे चरित्रात्मक पुस्तक आहे .
“शेतकऱ्यांचा आसूड”
नावाचे जे पुस्तक महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिले , त्याच्या
उपोदघातात शूद्र का खचले याची कारणमीमांसा त्यांनी
“विद्ये विना मती गेली , मतिविना निती गेली,नीतिविना गती गेली , गतिविना वित्त गेले , वित्ता विना क्षुद्र खचले , इतके अनर्थ एका अविद्येने केले.”
पुढे ते म्हणतात
“सांप्रत शेतकरी म्हंटले म्हणजे त्या मध्ये तीन भेद आहेत”

1),,,,,,,”शुद्ध शेतकरी अथवा कुणबी , माळी व धनगर”

“मूळचे जे लोक शुद्ध शेतीवर आपला उदर निर्वाह करू लागले ते कुळवाडी किंवा कुणबी”

2),,,,,,,”जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले ते माळी”

3),,,,,,,”जे हे दोन्ही धंदे करून मेंढरे बकरी यांचे कळप बाळगू लागले ते धनगर”

“या तीन जातीत आपापसात बेटी व्यवहार होत नाहीत , बाकी अन्य सर्व कांहीं होते”
याचाच अर्थ या तीन जातीत
“सामाजिक दर्जा मध्ये समानता आढळते”
“शिपाईगिरी व शहाणपणाच्या जोरावर कांहीनी जहागिरी व इनामे कमावली , शिंदे होळकर प्रति राजेच बनून राहिले”
(पृष्ठ क्रमांक 227/228महात्मा जोतिराव फुले ,,लेखक धनंजय किर)

हा दर्जा तपासायचा झालाच तर तो आपणास कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या बहिणीचा विवाह धनगर युवकांशी लाऊन दिला होता
यातून समजतो.
याही पुढे जाऊन “महात्मा जोतिबा फुले यांचे मृत्युपत्र पाहिले असता त्यात ते लिहितात,,,,,
“माझे मृत्यू मागे चि. यशवंताने नेहमी शाळेत जाऊन योग्य अभ्यास करून मॅट्रीक पास होऊन बाकीच्या पदव्या संपादन करण्याकरिता प्रयत्न न करिता उनाड परकी लोकांचे मुला सारखी वर्तणूक करू लागला,
तर माझे स्त्री ने सत्यशोधक सभासदांचे बहुमताने चि. यशवंतास माझे पुण्यातील घर नं. 394चे अथवा खानवडी येथील माझे वाटणी च्या वाड्यातील हिस्सा देऊन त्यास बाकी सर्व इस्टेतीमध्ये रद्द करावा.


आणि समाजातील सभासदांचे बहुमताने यशवंत चे जागी
“माळी, कुणबी , धनगर”
वैगेरे “क्षुद्र समाजातील”
जो कोणी मुलगा सर्व मुलात हुशार ,व लायक निघेल त्यास माझ्या
मालमिळकतीचा मालक करून त्याचे हातून सर्व कामे चालवून घ्यावी
यातून हाच बोध होतो की धनगर माळी व कुणबी “कुळवाडी”यात भेद नसून ते एकाच सामाजिक दर्जाचे आहेत , व त्यांचे राहणीमान , शैक्षणिक मागासलेपण , खान पान यात फारसा भेद नाही .
सामाजिक रूढी आणि परंपरा यातून गाव पाटीलकी आलेल्या मराठा समाजा कडे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आलेल्या राजकीय सत्तेतून आर्थिक व शैक्षणिक सत्ता कांहीं मराठा घराण्याच्या हातात एकवटली , यातून कांहीं वर्ग पुढे गेला , परंतु कोरडवाहू शेती आणि शेतीच्या विभाजना ने अती अल्प भूधारक व भूमिहीन बनलेल्या मराठा समाजाचे दारिद्य्र हे भयावह स्थितीत राहिले , दर तासाला किमान 7आत्महत्या या शेतकरी वर्गातील होत आहेत , शेतीवर काम करणाऱ्या भूमी हिन मराठा समाजाची स्थिती किती भयावह असेल याची कल्पना ही करवत नाही .
एका बाजूला छत्रपती शिवरायांचा स्वराज्य वारसा आणि यातून निर्माण झालेली प्रेरणा , स्वाभिमान आणि सामाजिक दर्जाचा अभिमान तर दुसऱ्या बाजूने पूर्णतः जगण्याचे झालेले वांदे अश्या विचित्र कोंडीत हा समाज सापडलेला आहे
या आरक्षण लढाया चालू असताना मराठा समाजाचे रमेश पाटील यांचे होणारे फोन ऐकताना त्यांनी आ शहाजी बापू पाटील यांचेशी केलेला वार्ता लाप सर्व कांहीं सांगून जातो .
ते म्हणतात बापू , आपल्या आया बहिणी शेतात काम करण्यास कुठेही मागे पुढे पाहत नाहीत , पण त्या हॉटेल व धाब्यावर काम करू शकत नाहीत.
मंडल आयोग लागू करताना केंद्रा द्वारे ओबीसी ची सूची जारी झाली यात माळी , धनगर आणि वंजारी ही समाविष्ट झाला पण मराठा वगळला गेला.
राजकीय पातळीवरील आरक्षण नाकारून फक्त शैक्षणिक आणि नौकरी तील आरक्षण मराठा समाजाला द्यावे असे स्पष्टीकरण जर मंडल आयोगाच्या शिफारशी त असते तर हा गुंता कधीच सुटला असता.
याही पेक्षा अधिक दुर्दैवी पण वाट्यास आले ते ओबीसी मधील एन टी , व मायक्रो ओबीसी समूहाच्या ,, बेलदार, माकड वाले , मदारी , लोहार , वडार , गोपाळ, (डोंबारी) वैदू , नंदी वाले , अश्या अतिशय मागास जातीना ही तोच ओबीसी दर्जा प्राप्त झाला , जो मराठा कुणबी , धनगर , वंजारी , माळी समाजाला मिळालेला आहे .
आणि या मुळे या आरक्षण लढाईचा पेच वाढलेला आहे .
ओबीसी आरक्षण लढाईत उचल्या कार लक्ष्मण गायकवाड यांना पुढे करून ढाल बनवताना युक्तीवाद केला गेला की आम्ही उंदीर , मांजर खाणारी लोक तुम्ही ते खाल का?
हाच प्रश्न धनगर , माळी व वंजारी समाजाला विचारला तर याचे उत्तर काय येईल?
याचे प्रामाणिक उत्तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन देण्याची हिंमत कोणाकडे आहे
अगदी वंचित चे राजकारण करणारे ही वेगवेगळ्या ताटाची भाषा बोलतात जी फसवी व राजकीय भाषा आहे
या उलट
मराठा समाजात राजकीय फूट पडावी म्हणून ते गरीब मराठा व श्रीमंत मराठा अशी वर्गीय फूट पाडून मराठा शक्तीला कमजोर करू पाहत आहेत
मग हाच न्याय सर्व जातीला का लावू नये?
असो हे सर्व राजकीय डावपेच आहेत आणि याला बळी पडेल इतके कोणी अज्ञानी राहिलेले नाही .
पण महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी हा तिढा सोडवावा च लागेल हे मात्र नक्की .
पण त्यासाठी प्रामाणिकता अंगी असलेली माणसे सत्तेत असणे आवश्यक आहे इतकेच ,,,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!