महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आषाढ पोर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ.

बी.एन.साळवे

उद्या आषाढ पोर्णिमा.या पोर्णिमेला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्व आहे.विशेष म्हणजे आषाढ पोर्णिमेपासून वर्षावासाचा प्रारंभ होतो.त्याविषयी अधिक माहिती देणारा हा लेख.

वर्षा म्हणजे पाऊस किंवा पावसाळा. वास म्हणजे राहाणे, निवास करणे.
तथागत बुद्धाच्या काळात आजच्या सारखी वाहने नव्हती.भिक्खूना पायी फिरूनच धम्मप्रसाराचे कार्य करावे लागत असे.मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर ते एकाच ठिकाणी वास्तव्य करून राहात.हा काळ आषाढ पोर्णिमा ते आश्विन पोर्णिमा असा असे.या काळालाच वर्षावास असे म्हटले जाई.

आषाढ पोर्णिमेला तथागत बुद्धानी पंचवग्गीय भिक्खूंना सर्वप्रथम धम्मोपदेश केला.हीच घटना बुद्ध इतिहासात प्रथम धम्मचक्र प्रवत्तन म्हणून प्रसिद्ध आहे.त्यानंतर यश या श्रेष्ठीपुत्राला व त्याच्या चार मित्राना बुद्धानी धम्मोपदेश केला व त्यांना भिक्खूसंघाची दीक्षा दिली.हळूहळू ही संख्या वाढत गेली. मात्र त्यानंतर पावसाळा सुरू झाला व तथागतानी भिक्खूंना या काळात एकाच ठिकाणी वास्तव्य करण्याचा उपदेश केला.
भगवान बुद्धानी त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यात एकूण 46 वर्षावास केले या काळात ते ज्या ठिकाणी थांबले त्याची यादी खालील प्रमाणे

वर्षावास क्र. — वास्तव्याचे ठिकाण – ई.स.पूर्व
1 ऋषीपतन 528
2 ते 4 राजगृह 527 – 525
5 वैशाली .524
6 मंकुल पर्वत (बिहार ) 523
7 त्रयस्यिंश 522

  1. सुमारगिरी (चुनार) 521
    9 कौशांबी 520
    10 पसरीलेयक ( मिर्जापूर ) 519
    11 नाला (बिहार ) 518
    12 वैरंजा (ऐटा जनपद ) 517
    13 चलिय पर्वत बिहार 516
    14 श्रावस्ती 515
    15 कपिलवस्तू 514
    16 आलवी (अरवल) 513
    17 राजगृह 512
    18 चालिय पर्वत 511
    19 चालीय प्रदेश 510
    20 राजगृह 509
    21 ते 45 श्रावस्ती 508 -484
    46 वैशाली 483

सदर माहिती संकलन ‘ वर्षावास ‘ (अयं वस्सान कालो) लेखक : चंद्रसेन बौद्ध या पुस्तकातून केले आहे.

(संकलन : बी.एन.साळवे)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!