“कवी” म्हणजे साहित्याचा सरसेनापती -डाॅ.संजय रामराजे

सेवा संस्था,बदलापूर आयोजित ‘ऋतू हिरवा’या निमंत्रीत कवी संमेलनात,संमेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषणात डाॅ.संजय रामराजे यांनी वरील उद्गार काढले.जन्माच्या वेळी लेकरु रडून दाखवतं,आईला कळतं,ती पहिली कविता असते.असंही ते म्हणाले.

हे संमेलन उल्हासनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहाराच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 21 जुलै रोजी संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून विविध वृत्तपत्रात स्तंभलेखन करणारे मध्य रेल्वे ईसीसी बॅकेचे चीफ मॅनेजर डाॅ.डी.एस.सावंत उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ,काही कवी अस्वस्थ असतात तर काही कवी स्वस्थ असतात.कवीने सत्य बोलणारी कविता लिहावी,बदलत्या युगाचा अंदाज घेऊन,सामाजिक सामीलकी जपावी.शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करणारी कविता लिहावी,अशी भुमिका मांडली.
तथागत भगवान बुद्ध,सम्राट अशोक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कवीसंमेलनाचे मुख्य संयोजक
कवी बी.अनील तथा अनिल भालेराव यांनी प्रास्ताविक केले.तर उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुधाकर सरवदे यांनी केले.या प्रसंगी लेखिका शितल चेंदवणकर यांच्या ‘प्रवास’या गुढ कादंबरीचे प्रकाशन करण्यात आहे.

‘ऋतू हिरवा ‘ कवीसंमेलनात पावसाच्या विविध रुपांवर कविता सादर झाल्या.रिमझीम पाऊस,सखी आल्यावर ती जाऊच नये सतत पडावा पाऊस, अवेळी बरसणारा पाऊस, बहरुन आलेलं रान,मन धुंद करणारा श्रावण पाऊस,मित्र पाऊस,छपरातून गळून ओलाचिंब करणारा पाऊस अशा विषयावर कविता सादर करण्यात आल्या.
हरिश्चंद्र दळवी,मधुकर गायकवाड, अजय गणवीर,स्मिता शिंदे,जिवन गांगुर्डे,प्रा अनिल कवठेकर,ज्ञानेश्वर शिंदे,संजय डी.वाघमारे,राजेंद्र पाटील,छाया गायकर,राहुल गायकवाड, समाधान लोणकर,प्रिती माने,राजेश साबळे,मंगेश म्हात्रे,सुमित हजारे,गिताश्री नाईक,आश्विनी म्हात्रे,प्रिया मयेकर,प्रा.अरुण अहिरराव,प्रा.राजेश वानखेडे,शितल चेंदवणकर,सुधाकर सरवदे,राजेंद्र मार्कंडेय, माधुरी पालक,सुभाष नाईक,विरा मेश्राम,प्रा.राजकुमार जगताप,राजेंद्र पवार,रमेश कांबळे,रितुराज पाटील,भटू जगदेव या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवयत्री प्रिती माने यांनी केले तर शेवटी सेवा संस्था महासचिव शामराव सोमकुंवर यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवासंस्था कार्याध्यक्ष सुनिल दुपटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत