आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन….


कर्तव्यदक्ष खासदार प्रणिती शिंदे यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पंढरपूर येथे दिले.

आषाढी वारी निमित्त पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे दिले.

यावेळी शिष्टमंडळात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान, राजेश पवार, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, युवा नेते पृथ्वीराज माने, प्रशांत शिंदे, श्रीकांत मेलगे, रवी कोळेकर, संदीप पाटील, किरण घाडगे, संदीप पवार आदी उपस्थित होते.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदनाचे पत्र मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

▪️२५१५ योजनेअंतर्गत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मंजूर करण्यात यावे

▪️अक्कलकोट तालुक्यातील बंदिस्त नलिका ऐवजी उघड्या कालव्याने कामे करण्यात यावे.

▪️अक्कलकोट तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते मंजूर करण्यात यावेत.

▪️मंगळवेढा तालुक्यातील भोसे व ३९ गावांचा पाणीपुरवठा योजने संदर्भात

▪️मंगळवेढा तालुक्यातील २४ गावच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उपसा सिंचन योजनेच्या टेंडरला मजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावे

▪️मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांचा समावेश असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामास निधी उपलब्ध करून कामे पूर्ण करण्यात यावे.

▪️मंगळवेढा तालुक्यातील मंजूर असलेले महात्मा बसवेश्वर स्मारकाची तत्काळ उभारणी करावी.

▪️पंढरपूर येथे MIDC स्थापन करण्यात यावे

▪️पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकासकामांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी

▪️मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात कामती, बेगमपुर (घोडेश्वर) कुरुल यापैकी एका ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे

▪️भीमा नदीवर अरबळी तामदर्डी बंधारा मंजूर होणेबाबत व वडापुर बँरेज मंजूर करण्यात यावे

▪️वडापुर ता. दक्षिण सोलापूर येथील भीमा नदीवर बँरेज बांधकामास मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावा.

▪️भीमा नदीला कालव्याच्या दर्जा मिळावा.

▪️दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं) कुरघोट, टाकळी, व करकल गावातील वीजपुरवठा आठ तास सुरू ठेवावा.

▪️दक्षिण सोलापूर मतदारसंघात औद्योगिक वसाहत उभी करावी.

▪️सिना नदीस कॅनलचा दर्जा देवून उजनीतून पाणी सोडण्यात यावे.

▪️सिना नदीवरील पाकणी ते कोर्सेगाव दरम्यान असलेले बंधारे दुरुस्त करण्यात यावे.

▪️मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द होऊन योजना शासनामार्फत पूर्ण करण्यात यावे.

▪️तीर्थक्षेत्र आळंद, देहू, भंडारा गड, व श्रीसंत चोखामेळा स्मारकासाठी महाराष्ट्र राज्य विकास आराखडा अंतर्गत मंजूर असणाऱ्या कामांची गती वाढवून श्रीसंत चोखामेळा स्मारकाचा विकास करण्यात यावा.
आदी मागण्या यावेळी करण्यात आला यावर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लवकरच उपाययोजना करून कामे मंजूर करू असे आश्वासन दिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!