भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ विश्व महामानव– प्रबुद्ध साठे

इंदापूर (शेटफळ हवेली) :– मानवाचे सुखी जीवन हा भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा विषय असून, संपूर्ण मानवी जगाचे कल्याण हे धम्माचे खरे ध्येय आहे, बौद्ध पौर्णिमा जागतिक मानवी जीवनाचा आनंद व सण असून भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ विश्व महामानव आहेत, असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते इंदापूर तालुका जिल्हा पुणे येथील शेटफळ हवेली येथे बुद्ध जयंती व बौद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित धम्म प्रवचनात बोलत होते,
सर्व प्रथम त्रीसरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली, यामध्ये सर्व ग्रामस्थ बंधू उपस्थित होते, गावातील मान्यवरांच्या हस्ते सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी मराठा, मातंग, माळी, धनगर, रामोशी, बौद्ध, इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रबुद्ध साठे आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले,,भगवान बुद्ध आपल्या सर्वांचे आहेत, त्यांच्या धम्म संस्कार व शिकवणीतून आपल्या कुटुंब, समाज, गावाचे कल्याण करुया व पंचशील हा गावाचा संस्कार बनावा, कार्यक्रमाचे आयोजन शंकर चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी, सर्व चव्हाण बंधू, यांनी उत्तम पणे केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत