महाराष्ट्रातील अतिक्रमणाचा विषय…..गड किल्ल्यासोबच बौद्ध लेण्यावरील अतिक्रमने काढली पाहिजे !
विजय अशोक बनसोडे
चला महाराष्ट्रात अतिक्रमणाचा विषय निघालाच आहे तर….राज्यातील 150 किल्ल्यावरील अतिक्रमण काढताना महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यावर सुद्धा अतिक्रमण करण्यात आलेले आहे ते सुद्धा काढलेच पाहिजे ! महाराष्ट्रातील अनेक प्राचीन बौद्ध लेण्यावर पंड्या पुजाऱ्यांनी विविध देवी देवतांच्या नावावर अतिक्रमण केले आहे.*हजारो वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यावर अतिक्रमण,मंदिरे आणि मठाच्या नावावर हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण,शहरातील-गावातील रस्ते आणि चौका चौकात देवळाच्या नावावर अतिक्रमण,सगळीकडे काय तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का ?
महाराष्ट्र राज्यातील नुसते गड-किल्ल्यावरचे अतिक्रमण काढताना महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यावरील अतिक्रमण ही काढलेच पाहिजे ! *का केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून “मताचे” ध्रुवीकरण करण्यासाठी दंगली करता साल्यानों…. अबाल-वृद्धांना आणि महिलांना मारहाण करता का ? एखाद्या परिवाराच्या संसाराला उध्वस्त करून काय मिळतं ? अतिक्रमण काढायचं आहे तर सरकारी मार्गाचा अवलंब करा ना… गुंडागर्दी आणि दहशत कशासाठी ? काय महाराष्ट्र सरकारने गुंडांना पोसले आहे का जे आता मताच्या धृवीकरणासाठी कळीचे मुद्दे काढून दंगली माजवत आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन बौद्ध लेण्यावर हजारो वर्षापासून अतिक्रमण करून बसलेले पंड्या पुजारी आहेत.या कडे ही जरा गांभीर्याने सरकारने पाहिलं पाहिजे.
महाराष्ट्रात मठ आणि आश्रमाच्या नावावर हजारो एकर जमिनीवर कब्जा करण्यात आलेला आहे.गाव-शहरात,रस्त्यावर चौका चौकात इतकंच नाही तर सरकारी जागे,सरकारी कार्यालयच्या आवारात आनं इमारती मध्ये सुद्धा विविध देवी-देवतांच्या देवळाच्या नावावर अतिक्रमने करण्यात आलेली आहेत. ही अतिक्रमणे सरकारच्या आनं जातीवादी राजकारन्यांच्या बापाची मिराजदारी आहे का ? ती सुद्धा काढलीच पाहिजे.
विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक 8600210090
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत