“मुलींना मोफत शिक्षण” लागू. नियम व अटीबद्दल सविस्तर माहिती.
A) कोणते सामाजिक प्रवर्ग पात्र आहेत.
1) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
2) इतर मागास प्रवर्ग (OBC)
3) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC)
4) महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रमाणित अनाथ मुले आणि मुली सुद्धा पात्र असतील.
——–SP————
B) कोणत्या कोर्सेसना लागू असेल.
1) Technical Education: UG&PG – Engineering, Pharmacy, Agriculture, Architecture, Planning, Design, MBA, MMS, MCA, Fine Art, Direct Second Year.
2) Higher Education: UG&PG- LLB5, LLB3, B.Ed., BPEd
3) Medical Education: UG&PG- MBBS, BDS, BAMS, BHMS, BPTH, BUMS, BASLP, Nursing.
4) Animal Husbandry, Dairy Technology and Fishery.
———–SP———-
C) कोणत्या महाविद्यालयांना लागू असेल.
1) शासकीय महाविद्यालये (Govt Colleges)
2) निम शासकीय (Semi -Govt)
3) शासन अनुदानित अशासकीय (Govt Funded / Private)
4) अंशतः अनुदानित (Partially Funded / Subsidized)
5) कायम विनाअनुदानित (Non Granted)
6) तंत्रनिकेतन (Polytech)
7) सार्वजनिक विद्यापीठे (Public Universities)
8) शासकीय अभिमत/ स्वायत्त विद्यापीठे (Govt Approved Universities)
———SP——–
D) कोणत्या महाविद्यालयांना लागू नाही.
1) खाजगी अभिमत/ स्वायत्त विद्यापीठे (Private Deemed Universities)
2) स्वयं अर्थसहायित विद्यापीठे (Self Financed Universities)
———-SP———
E) कोणत्या प्रवेश प्रक्रियेतून ( Admission Type ) प्रवेश मिळालेला असावा / नसावा.
1) केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे (Centralised Admission Process-CAP )
2) व्यवस्थापन कोट्यातील (Management Quota) किंवा संस्थास्तरीय कोट्यातून (Institutional Quota) प्रवेश मिळाला असल्यास ही सवलत लागू होणार नाही.
———-SP———
F) प्रवर्गानुसार उत्पन्नाची अट व नियम
1) OBC ,SEBC मुलींच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्त्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
2) EWS प्रवर्गासाठी , राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत फी माफीचा लाभ घ्यायचा असेल तर, EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील ( दोन्ही पालकांचे ) एकत्रित उत्त्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागेल.
———–SP———-
G) कोणत्या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना लागू असेल.
1) शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये ज्या मुली उपरोक्त महाविद्यालयात आणि कोर्सेस साठी प्रवेश घेतील त्या सर्वांसाठी ही योजना लागू असेल.
2) सन २०२४-२०२५ पूर्वी ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनाही इथून पुढे ही सवलत मिळेल.
————-SP——–
H) नेमकी किती व कोणती फी माफ होणार आहे.
महाविद्यालयाची फी ढोबळमानाने चार प्रकारात विभागलेली असते.
1) शिक्षण शुल्क (Tuition Fee)
2) इमारत व बांधकाम अधिभार (Developement Fee)
3) सुरक्षा ठेव (Security Deposite)
4) इतर शुल्क (Other Fee)
EWS, OBC आणि SEBC (या वर्षी पासून) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम भरावी लागत होती.
सदर योजने अंतर्गत आता या तीनही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क 100% माफ असेल. मात्र Development fee आणि इतर फी भरावी लागेल.( कारण GR मधे कुठेही डेव्हलपमेंट फीचा उल्लेख नाही)
(टीप: अंदाजे Development Fee ही Tution Fee च्या 10% असते.
उदा- Tuition fee जर Rs.1,00,000 असेल तर
Development Fee Rs.10,000 असेल)
———–SP———–
(जनहितार्थ प्रकाशित, कॉपी पेस्ट मजकूर आहे, अधिक माहितीसाठी आणि अवलोकानार्थ शासकीय जी.आर. पाहावा.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत