आग ही आगचं असते…! – डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’

देशात पेटणारी धर्मांध आग असो
वा मनाची जळणारी आग
आग ही आगचं असते
आणि आगीचा उडणारा वणवा
हा बेचिराख करणारा असतो
म्हणुन महाकारुणीक बुध्द
प्रेम मैत्री बंधुता करुणा सांगतांना
शांती अहिंसा असा संदेश देतात
निसर्गाचा समतोल जपतांना
प्राणीमात्रांवर प्रेम दया करणे
असा उपदेश करीत असतात
हे उगिचचं नव्हे रे मित्रा…
निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर
वृक्ष वल्ली फुलांना जपतांना
कुणी त्यास तोडतांना बघुन
मनाला होणारी ती तिव्र वेदना
हृदयाला ही खुप पिडा देत असते
माझ्या बागेतील वृक्ष वल्ली असो
वा रंगी बिरंगी फुलांचे फुलणे
मोहक गंधाचा मधु आस्वाद
फुलपाखरे भुंगे ह्यांच्या समवेत
मला तो घेण्याचा आनंद असतो
आणि माझ्या बागेतील बुध्द
स्मित करण्याचा अनुभव देतो…
कधी ह्या निसर्गाच्या सानिध्यात
जंगलाच्या हिरव्या झाडाखाली
वा कधी धरणाच्या काठावर बसुन
जीवनाचा आनंद शोधत असतो
प्राचिन इतिहासाच्या जाड भिंंती
हा माझ्या प्रेमाचा सखा होतो
प्राचिन इतिहासात डोकावल्यावर
शुध्द मानवी भाव बघत असतो
सत्य निष्ठा – प्राण निष्ठा – शब्द निष्ठा
मग ह्या वर्तमान काळात आल्यावर
दैनंदिन जिवनात शोधित असतो
तेव्हा वर्तमानात आम्ही खुप मागे असतो…
नागपूर, दिनांक २९ एप्रिल २०२४ डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’ नागपूर मो. न. ९३७०९८४१३८
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत