महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण

एकही मुस्लीम उमेदवार दिला नसल्याने राजीनामास्र
मुंबई : महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
90% मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले, महाविकास आघाडीने मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा जिंकल्या पण काँग्रेसने विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही. मात्र OBC पार्श्वभूमी असलेल्या आणि महाविकास आघाडीविरुद्ध काम करणाऱ्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली, असा आक्षेप अब्दुल हाफीज यांनी घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील राज्यात महाविकास आघाडीने 48 पैकी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. यावरून मुस्लीम नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अब्दुल हाफिज यांनी आपला राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Prabuddh Bharat
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत