नारायण सरकार हरी उर्फ भोले बाबा
नारायण सरकार हरी उर्फ भोले बाबा,या बाबाच खरं नाव सुरज पाल असून तो यूपी पोलीस मध्ये कॉन्स्टेबल होता.याच्या प्रवचनात गोंधळ उडाल्याने 121 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला.(02/07/24) यात महिला, लहान मुलं यांचे प्रमाण जास्त आहे.
( रामदासी बैठक वाले धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतानाही दिवसभर उपाशीपोटी उन्हात थांबल्याने सोळा भाविकांचा मृत्यू झाला होता. हा धर्माधिकारी निवेदन स्वीकारतो आणि लग्न करावे का नाही यावर सल्ला देतो. थोडक्यात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवतो. याच्याकडे खरेच दैवी शक्ती होती तर होणाऱ्या भाविकांचे मृत्यूचे भाकीत का केले नाही? किती जखमींना हा इसम जावून भेटला? किती मृत भाविकांच्या कुटुंबियांना याने आर्थिक मदत केली?असो…)
बाबाने जिथे पाय ठेवला ती माती डोक्याला लावल्यास आपले आजार बरे होतात असा भक्तांचा समज होता. ती माती घेण्यासाठी गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन 121 भाविक मृत्यू पावले.
या बाबामध्ये दैवीशक्ती आहे, तो भूतबाधा दूर करतो, दुर्धर आजार बरे करतो असा प्रचार प्रसार जनतेमध्ये आहे, हा गैरसमज वाढत राहून भाविक मानसिक गुलाम व्हावेत यासाठी बाबाने विशेष प्रयत्न केलेले दिसत आहेत.
आपल्याकडे दैवी शक्ती आहेत असा या बाबाचा दावा असतो, सोळा वर्षाच्या मृत मुलीला जिवंत करण्याचा हा प्रयत्न करत होता, यासंदर्भात त्याला 2000 साली अटकही करण्यात आली होती.
हा बाबा भक्तांना पिवळ्या रंगाचे लॉकेट देतो ज्यावर त्याचा फोटो असतो. बाबाचा सत्संग सात वेळा ऐकला की तुम्ही सेवादार होता. सेवाधाराला वेगळा ड्रेस असतो, गुलाबी रंगाचा.
( रामदासी बैठक वाल्यांना ठराविक हजेरी भरल्यानंतर घरात अनुष्ठान करण्याची परवानगी मिळते. भक्तांना आयडेंटिटी देण्याचा हा प्रयत्न असतो. भक्तांच्या या मानसिकतेचा बरोबर फायदा धर्माधिकारी व भोले बाबा यासारख्या लोकांनी उठवला आहे.)
बाबाचे बहुतांश भक्त निम्न आर्थिक स्तरातील होते, तुम्ही आज चांगले कर्म करा म्हणजे पुढील जन्म तुम्हाला चांगल्या घरात मिळेल असं तो सांगायचा.
( जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींमुळे माणस हतबल झाली आहेत. काहीजण व्यसनाचा आधार घेतात,काहीजण या बाबाबुवांचा आधार घेतात. )
????????माणूस म्हणून जगायचं असेल तर भूक, रोटी, गरिबी, आजारपण,मजबुरी, लाचारी, प्रेम, कर्तव्य, त्याग, मोह,माया,लोभ,लालच,आजारी आई,दारुडा बाप, बिन लग्नाची बहीण,ऑफिस, बॉस,इन्क्रिमेंट,प्रमोशन,ट्रान्सफर,सस्पेन्शन खड्ड्यातला प्रवास, सामाजिक जबाबदाऱ्या,धार्मिक कर्मकांड,नैतिक कर्तव्य आपल्याला हव असलेलं मोठं घर, नवी कार, बायकोच्या न संपणाऱ्या मागण्या, मुलांचे शिक्षण, त्यांना हवे असलेले स्मार्टफोन, टॅबलेट, एलईडी टीव्ही आणि आपण आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहोत असे दाखविण्याची खाज अशा हजार झंझटी सोडवाव्या लागतात.(लोकसत्तातून )
कर्जबाजारी होण,आजारपण, व्यवसायात अडचणी, लग्न न जमणे, जमिनीची कोर्ट कचेरी, कौटुंबिक वाद विवाद, गरिबी या प्रश्नांना भिडणारी सर्वसामान्य जनता हतबल होऊन बाबा बुवाच्या नादी लागते. मानसिक गुलाम होऊन दैवावर भरवसा ठेवतात यातून तात्पुरता दिलासा मिळतो पण प्रश्न तसेच राहणार असतात.
_सिद्धेश्वर (040724)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत