हारीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती धरित्री विद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन

हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा :- सुनिल पुजारी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
आज दिनांक १ जुलै २०२४ रोजी धरित्री विद्यालयात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भाषण स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली.सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी इतिहासाचे रंग रूप हे स्वागत गीत सादर केले .यानंतर इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून १० विद्यार्थिनी व इयत्ता आठवी ते दहावी या गटातील ०८ विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत भाषणाच्या स्वरूपात व्यक्त केले. हारित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थांनी मार्गक्रमन करावे यामधुन विद्यार्थांना नक्कीच प्रेरणा मिळेल आसे प्रतिपादन धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी यांनी केले .
नुकताच वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस ते बोलत होते .
लिहिलेल्या संत सूर्य गावकरी ,धाराशिव नामा ,संघर्ष , सोलापूर भूषण या वर्तमानपत्रातील वसंतराव नाईक यांच्या जीवनपटावरील लेखाचे वाचन इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी भुमकर हिने केले. यानंतर सुनील पुजारी यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले लहान गटातून प्रथम क्रमांक करण पिस्के, द्वितीय क्रमांक स्वरा कांबळे व तृतीय क्रमांक आरुषी राठोड या विद्यार्थ्यांचा आला तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी पवार द्वितीय क्रमांक नागिणी हुल्ले व तृतीय क्रमांक वैष्णवी पिस्के व संस्कृती कदम या विद्यार्थिनींचा आला.परीक्षक म्हणून होळे युवराज यांनी काम पाहिले. भाषण स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आला. तसेच याप्रसंगी दयानंद महाविद्यालय लातूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शास्त्रज्ञांच्या जीवनपटावरील निबंध स्पर्धेत प्रथम ३ क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैष्णवी तुळशीराम पवार हिचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते गोल्ड मेडल सर्टिफिकेट व पुष्प देऊन करण्यात आला . द्वितीय क्रमांक मिळवलेल्या प्रगती उत्तम वाघमारे* तिचा सत्कार सिल्वर मेडल ,सर्टिफिकेट व पुष्प देऊन शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी केला तृतीय क्रमांक मिळवलेल्या अयोध्या हरिलाल करदुरे हिला ब्रांझ पदक, सर्टिफिकेट व पुष्प देऊन सुनील पुजारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.भाषण स्पर्धेनंतर दुपारच्या सत्रात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेची जबाबदारी होळे युवराज यांनी पार पाडली. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील २६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातलगावकर अण्णाप्पा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रमेश चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमासाठी परिश्रम जगदेवी शंकरशेट्टी ,विठ्ठल पाटील कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत