दीक्षाभूमीवर RSS च्या लोकांचा ताबा आहे?

अरुण गाडे, नागपूर
दीक्षाभूमीवर RSS च्या लोकांचा ताबा आहे. समिती Rss ची हस्तक आहे,rss धर्जिनी समिती नकोच
स्मारक समिती द्वारा आंबेडकर कॉलेज चालविले जाते या कॉलेज मधे गणपती बसविला जातो, आम्ही आंदोलन केल्यानंतर प्रथा बंद झाली, दीक्षाभूमीवर 22प्रतिज्ञा म्हणण्या साठी मज्जाव केला जातो, ही समिती rss ची गुलाम झाली आहे,याच समितीच्या लोकांच्या माध्यमातून दीक्षाभूमीवर नियंत्रण ठेवले जाते. दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीवर 13 लोकं नावाचेच आहे. खरी सत्ता rss राबवित आहे.
अंडर ग्राउंड पार्किंगचा निर्णय हा स्मारक समिती ने आंबेडकरी समाजाला अंधारात ठेऊन घेतलेला आहे, उपमुख्यमंत्री यांनी आज स्पष्ट केले की, हा निर्णय स्मारक समितीचा आहे.
स्मारक समितीने विश्वासघात केला आहे. दरवर्षी ही समिती धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला कट्टर rss वाल्या नेत्यांना आमंत्रित करून दिक्षाभूमीचे पावित्र्य घालवीत आहे आता ही समिती नकोच. समितीला बदलण्याची गरज आहे.
दिक्षाभूमीच्या सौंदरीकरणाला समाजाचा विरोध नाहीच, फक्त पार्किंगच्या नावावर होणाऱ्या अंडरग्राउंड बांधकामाला विरोध होता त्यासाठी समाजाने स्वतः पुढाकार घेऊन समाजातील नेत्यांना बाजूला ठेऊन आज आंदोलनाची हाक दिली व नेत्याशिवाय समाजाने एकजूट दाखविली त्यांचा परिणाम सरकारला झुकावे लागले व बांधकामाला स्थगिती दिली. आम्हाला फक्त स्थगिती नको आहे. अंडर ग्राउंड कुठलेही बांधकाम नको आहे. उपमुख्यमंत्री यांनी जनता व स्मारक समिती यांची बैठक घेऊन चर्चेतील निर्णयानुसार निर्णय घेऊ म्हटले आहे.
स्मारक समितीने आम्हा आंबेडकरी जनतेच्या विरोधात कुठलीही बदमाशकी केली तर ती सहन केली जाणार नाही.
आंबेडकरी नेत्यांना आज जाग आली इतके दिवस हा प्रश्न चिघळत असताना जाग आली नाही, जेव्हा आंबेडकरी जनता उत्स्फूर्त पणे दिक्षाभूमीवर आंदोलनात उतरल्यानंतर यांना जाग आली.आयत्या बिळावर नागोबा..! या नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
आंबेडकरी समाज लढवय्या आहे. अनेक आंदोलनातून त्यांनी दाखवून दिलं आहे.
माझ्या सर्व बांधवांचं मनःपूर्वक अभिनंदन… ????????
आपणास विनंती यापुढे गाफिल राहू नका. स्मारक समिती व घातकी आंबेडकरी नेते यांना हटवा आंदोलन आता सुरु करा व दीक्षाभूमी rss च्या पंजातून मुक्त करा… जयभीम
अरुण गाडे, नागपूर
आशिष त्रिवेदी , के.पी. जोशी, मेजर कुलकर्णी ही लोकं कोण आहेत? यांचा दीक्षाभूमी समितीवर काय संबंध?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत