रामदासी बैठकीत बहुजन शाळकरी लहान मुलांचा वाढता सहभाग एक गंभीर बाब
लोकजागर टीम
दिनेश मोरे-धुळे
आजकाल बऱ्याच शाळकरी मुलांच्या कपाळावर एक लहानसा कुंकुवाचा टिळा दिसतो. त्यांना विचारल्यावर उत्तर मिळतं.हा “सद्गुरुचा टिळा आहे “. हे “सद्गुरु म्हणजेच दत्तात्रेय तथा आण्णा धर्माधिकारी. त्यांच्या प्रेरणेने (?) रामदासी बैठका खुप तेजित आहेत.
त्यातल्या बऱ्याच मुंलाना विचारलं, कि त्या बैठकीला कौंतील कुलकर्णी, समीर वैद्य, पाठक, जोशी, पुराणीक आशी नावं असलेले किती मुलं असतात ? त्यावर एकही नाही हे त्यांचे उत्तर.
मग आपल्या मुलात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवायचा सोडून त्या फालतू काल्पनिक पापपुण्य, अशा दांभिक संस्काराच्या नावाने चालणाऱ्या या कुभांडात बहुजन समाजातील मुलांनाच अडकवतो आम्ही ?
संतांनी सांगीतलेला खरा भक्तीमार्ग ज्या वारकरी संप्रदायाने संगीतला त्यांनी रामदासांना कवडीची किंमत दिली नव्हती. तिथेच आता रामदासांना सन्मानाने मिरवल जात आहे. देहू येथील गाथा मंदीराच्या बाजूला झालेली घुसखोरी त्याची साक्ष आहे.
विषमतावादी जातीयवादी समर्थ रामदास खरे कोण होते ? ब्राम्हणेतरांना त्यांच्या मनात काय स्थान होते ? हे सांगणे महत्वाचे आहे.
रामदासी बैठकीत रामदास कृत दासबोध वरच बोलले जाते.
रामदास हा गुरु तर नव्हताच, याऊलट तो जातीयवादी आणि विषमतावाती होता.ब्राह्मणी वर्चस्वासाठी त्याने हयात घालवली.ब्राह्मणेतरानी ज्ञानार्जन करू नये,हा रामदासाचा आग्रह होता.गुरु हा फक्त ब्राह्मणच असू शकतो,इतरांना तो अधिकार नाही,याबाबत रामदास म्हणतो.
गुरु तो सकळाशी ब्राह्मण।जरी तो झाला क्रियाहीन I
सर्वांनी ब्राह्मणाला वंदन केले पाहिजे,याबाबत रामदास म्हणतो.
सकाळाशी पूज्य ब्राह्मण।
हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण।
सर्वांनी ब्राह्मणाला जेवण दिले पाहिजे,याबाबत तो म्हणतो
लक्षभोजनी ब्राह्मण।आन जातीस पुसे कोण I
ब्राह्मणाला देव वंदन करतात तेथे माणूस काय चीज आहे.
असो ब्राह्मण सुरवर वंदिती।
तेथे मानव बापुडे किती।
ब्राह्मण मूर्ख असला तरी त्याला जगाने वंदावे, असे तो म्हणतो.
जरी ब्राह्मण मूढमती ।तरी तो जगतवंद्य I
ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत बाकी ब्राम्हणेतरांना तुच्छ लेखणारा रामदास च्या बाबतीत
प्राच्यविद्यापंडीत शरद पाटील म्हणतात रामदासाचे संपूर्ण जीवन जातिभेदाने ओतप्रोत भरलेले आहे.
रामदास म्हणतो,
अंत्यज शब्दाज्ञाता बरवा।
परी तो नेवून काय करावा।
ब्राह्मण सन्निध पुजावा।
हे तो न घडे की।
दलित हा ब्राह्मणाची बरोबरी करू शकत नाही.असे रामदास म्हणतो,
अंतर एक तो खरे।परी सांगाते घेऊ न येती महारे I
पंडित आणि चाटी पोरे।
एक कैसी।मनुष्य आणि गधडे।
राजहंस आणि कोंबडे।राजे आणि माकडे Iएक कैसी।
अशा प्रकारे महार आणि ब्राह्मण एक होऊ शकत नाहीत, असा रामदास जातिभेद वृद्धीगत करतो.खरे तर रामदास आणि त्याचे उदात्तीकरण करणारावर ऍट्रॉसीटी केली पाहिजे,इतका तो जातीयवादी होता.
रामदास हा विषमतावादी होता,त्यामुळे भेदाभेद भ्रम अमंगळ अस असणाऱ्या त्याला वारकरी पंथात स्थान नाही,
डॉ आंबेडकर त्यांच्या ‘जातिनिर्मूलन’ या अभिजात ग्रंथात म्हणतात की “ब्राह्मणात कोणीही क्रान्तीकारक/महापुरुष झाला नाही.”
त्यामुळे ब्राह्मणांनी एक युक्ती शोधून काढली, आपल्यात कोणी महापुरुष झाला नाही तर मग आपण महापुरुषांचे गुरुच होऊन टाकायचे, म्हणजे आपोआप बहुजन महापुरुषांच्या कार्याचे श्रेय ब्राह्मणाकडे जाते आणि बहुजनांवर वर्चस्व प्रस्थापित करता येते.
आणी आता तोच प्रकार पुन्हा लहानपणीच शाळकरी मुलांना मानसीक गुलामगिरीत लोटण्याचा राजरोस प्रयत्न होतोय व संत नामदेव, तुकोबा यांची परंपरा सांगणारा ह.भ.प हताशपणे ते सारे बघतोय.
म्हणून एक कळकळीची विनंती हि पोस्ट जास्तीत जास्त बहुजन भावंडाकडे पोहोचवा. व आपल्या पाल्याला देवभोळा न बनवता विवेकी विज्ञानवादी बनवा व मानसिक गुलाम बनविण्याचा मनुवादी डाव हाणून पाडा.
दिनेश मोरे-धुळे
९३७०९८४४८४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत