देशमहाराष्ट्रमुख्यपान

चैतन्यदायी अस्तित्व प्रकटले !

अनामिक

लोकसभेत “प्रश्न विचारण्यापोटी धनप्राप्ती” चा आरोप लावून तृणमूल काँग्रेसच्या ख़ूबसूरत खासदार महुआ मोईत्रा हिला संसदेच्या “नीतिमत्ता समिती”ने तिला स्पष्टीकरणाची संधी न देता किंवा तिच्या हरकती कडे कानाडोळा करत मनमानीपणे गत डिसेंबरमध्येच निष्कासित केले होते. जणू संसदेत नीतिमत्ता ओसंडून वाहत होती व महुआमुळे त्या प्रवाहास खिळ बसला होता ! तेंव्हा विरोधी पक्ष हा अतिशय क्षीण व दुर्बल असल्याने भाजपाई लोकसभाध्यक्ष ओम बिरलाने अन्यायाने तिचा अशाप्रकारे बळी घेऊन चरणचुंबक चापलुसीचे उदाहरण पेश करत आपल्या धन्यास संतोष देत धन्यवाद मिळवले होते. मी हळहळलो होतो. आपल्या प्रभावी इंग्रजीतून सर्वेसर्वा “भाऊसाहेब” ह्यांना निरुत्तर करण्याची किंवा त्यांना धारेवर धरण्याची क्षमता तिनं जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा वारंवार दाखवली होती आणि एक महिला असूनही वारंवार आपला पुरुषार्थ तिनं सिद्ध केला होता. तिची संसदेतील उपस्थिती आकर्षक ही केवळ तिच्या बाह्य व्यक्तीमत्वातूनच नव्हे तर तिच्या इंग्रजीतील फर्ड्या वक्तृत्वातूनही नजरेत ठसत होती. निष्कासनानंतर संसदेबाहेर येत तिनं गर्जना करून जनतेचं समर्थन घेऊन “मी पुन्हा येईन !” हा निग्रह व्यक्त केला होता. लोकांचे प्रचंड समर्थन घेत ती यंदा पुन्हा लोकसभेत प्रकटली. परवा जेंव्हा तिने खासदार म्हणून भाऊसाहेबाच्या नाकावर टिच्चून शपथविधी झाला तेंव्हा शपथेचा समारोप “जय हिंद! जय संविधान!!जय बांगला !!!” असा जेंव्हा केला तेंव्हा विरोधी बाकावरून “देख लो जनता का इन्साफ़ ! महुआ जीत गई !!” असे नारे बेंचेसवर थापट्या मारत लावले गेले. “जय संविधान !” म्हटल्यामुळे सत्ताधारी बेंचेस बेचैन झाले. त्यावेळेस ओम बिरला अध्यक्षस्थानी असते तर ते अवघडल्यासारखे चेहरा पाडून बसले असते. तिच्या रुपात संसदेला पुन्हा आकर्षक चैतन्य मिळालं आहे. भाऊसाहेबास कोंडीत पकडण्याची ती एकही संधी आता नेहमीप्रमाणेच सोडणार नाही, हे निश्चित. आता राहुलच्या नेतृत्वाखालील विरोधी दलाची मजबूत साथ तिच्या समर्थनार्थ उपलब्ध आहे. तिचा आवाज आता सहजगत्या दाबता येणार नाही.
अनामिक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!