देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

लोकसभा अध्यक्ष व संसदीय परंपरा -प्रा डी डी मस्के


“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””'””””””

लोकसभा अध्यक्ष किंवा सभापती या पदाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून झालेला विकास हा पुढील प्रमाणे सांगता येतो. कायदेमंडळ या संस्थेचा उगम १३१५ साली इंग्लंडमध्ये राजा पहिला एडवर्ड यांच्या कारकीर्दीत झाला. त्याने स्थापन केलेल्या द्विगृही “मॉडेल पार्लमेंटचे” कालांतराने द्विगृही संस्थेत रूपांतर झाले. कनिष्ठ ग्रहाच्या कार्याध्यक्षाला सभापती म्हणण्याची प्रथा इंग्लंडमध्ये सुरू झाली. तेराव्या शतकात कॉमन्स सभागृह हे राजाला विनंती, अर्ज सादर करणारी संस्था होती. आजच्या काळाप्रमाणे विधी नियम तयार करणारी संस्था असे कॉमन्स सभागृहाचे स्वरूप नव्हते.
कॉमन्स सभागृहाच्या वतीने राजाशी बोलण्याचा त्यांची भेट घेण्याचा अधिकार केवळ सभापतीला होता. म्हणून कॉमन्स सभागृहाचा राजाशी बोलणारा प्रतिनिधी स्पीकर (Speaker) असे त्याला संबोधण्यात येऊ लागले. काळाच्या ओघात अनेक संविधानिक बदल घडवून आले.

भारतात कायदेमंडळ या संस्थेचा उगम ब्रिटिश राजवटीच्या उत्तरार्धात म्हणजेच १८६१ च्या भारत विधिमंडळ कायदा (Indian Councils Acts) संमत करण्यात आल्यानंतर झाला.१८९२,१९०९,१९१९,१९३५ च्या घटनात्मक सुधारणा कायद्यातील तरतुदीनुसार प्रांतिक कायदेमंडळाचा क्रमांक विकास होत आला त्यानंतर भारताने त्याला १९५० संविधानात्मक दर्जा दिला.
लोकसभा अध्यक्ष
हे पद अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. लोकसभेचे कामकाज शांततेने व व्यवस्थितपणे पार पाडणे व संपूर्ण सभागृहावर नियंत्रण ठेवून मार्गदर्शन करणे हे प्रमुख काम मानले जाते.
भारतीय संविधानाच्या कलम ९३ ते १०० मधून लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या तरतुदी आलेल्या आहेत.
लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड कशी करावी हे कलम ९३ मध्ये स्पष्ट केलेले आहे. लोकसभेचे सदस्य आपल्यातूनच एकाची अध्यक्ष आणि अन्य दुसऱ्याचे उपाध्यक्ष म्हणून लवकरात लवकर निवड करतील. म्हणजेच नवनिर्वाचित लोकसभा सदस्या मधून लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो.
लोकसभाध्यक्षासाठी १९५२ व १९७६ ला निवडणूक झाली. त्यानंतर २०२४ लाच लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होत आहे.
लोकसभा अध्यक्ष पद हे सत्ताधारी पक्षाला आणि लोकसभेचे उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला देण्याची पद्धत लोकशाहीला मजबूत करणारी आहे. परंतु या पद्धतीला आणि संकेताला नरेंद्र मोदींच्या सरकारने छेद दिलेला दिसून येतो. लोकसभेचे उपाध्यक्ष विरोधी पक्षाला दिले असते तर लोकसभेचा अध्यक्ष परंपरेप्रमाणे बिनविरोध निवडून आला असता.

लोकसभा अध्यक्ष हे सर्व सहमतीने बिनविरोध निवडून आलेले दिसून येतात. सर्व समावेशक लोकसभा अध्यक्ष ची निवड करताना तेलगू देशम पक्ष आणि शिवसेनेला लोकसभा अध्यक्ष पदाची संधी मिळालेली दिसून येते. तेलगू देशम पक्षाचे जी एम सी बालयोगी तर शिवसेनेचे मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झालेले दिसून येतात. आज होत असलेल्या लोकसभा अध्यक्ष च्या निवडणुकीत कोण विजय होते हे बघणे मोठे मनोरंजक ठरणार आहे.

आत्तापर्यंतचे लोकसभा अध्यक्ष व त्यांचा कार्यकाल

०१, ग वा मावळणकर १५.०५.१९५२ ते २७.०२.१९५६
०२,अनंतशयणम अयंगार ०८.०३.१९५६ ते १६.०६.१९५२
०३, सरदार हुकूमसिंग १७.०४.१९६२ ते १६.०३.१९६७
०४, नीलम संजीव रेड्डी १७.०३.१९६७ ते १९.०७.१९६९
०५, जी एस धिलाॅं. ०९.०८.१९६८ ते ०१.१२.१९७५
०६, बळीराम भगत ०५.०१.१९७६ ते २५.०३.१९७७
०७, नीलम संजीव रेड्डी २६.०३.१९७७ ते १३.०७.१९७७
०८, के एस हेगडे २१.०७.१९७७ ते २१.०१.१९८०
०९, डॉ बलराम जाखड २२.०१.१९८० ते २७.११.१९८९
१०, रवी रे. १८.१२.१९८९ ते २०.०६.१९९१
११, शिवराज पाटील २०.०६.१९९१ ते मे १९९६
१२, पी ए संगमा. मे १९९६ ते फेब्रुवारी १९९८
१३, जी एम सी बालयोगी. मार्च १९९८ ते ऑक्टोबर १९९९
१४, जी एम सी बालयोगी. ऑक्टोबर १९९९ ते एप्रिल २००२
१५, मनोहर जोशी. १०.०५.२००२ ते०६.०२.२००४
१६, सोमनाथ चटर्जी मे २००४ ते मे २००९
१७, श्रीमती मीरा कुमार. मे २००९ ते मे २०१४
१८, श्रीमती सुमित्रा महाजन मे २०१४ ते मे २०१९
१९, ओम बिर्ला. जून २०१९ ते मे २०२४

प्रा डी डी मस्के

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!