विद्यार्थीच्या शैक्षणिक जिवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे :- सुनिल पुजारी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचलित धरिञी विद्यालय नळदुर्ग आलियाबाद येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी ८० टक्के उपस्थिती धरित्री विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले . निसर्गाने जसे तुमचे पावसाच्या रूपाने स्वागत केले. तसे आम्ही तुमचे पुष्प, पाठ्यपुस्तक, देऊन स्वागत करीत आहोत या शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या गुणवत्तेत वाढ करण्याचा प्रयत्न करा.
आज जिकडे तिकडे मुलीचा धबधबा निकालात दिसत आहे त्यासाठी मुलांनी सुद्धा अभ्यासात स्वतःला गुंतून घ्यावे. शाळेला नेहमीच उपस्थित राहावे अभ्यास करावा, शाळेतील जास्तीच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे प्रगती होत नसते म्हणून विद्यार्थांच्या सर्वांगिण शैक्षणिक जिवनाचा विकास झाला पाहिजे आसे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनिल पुजारी यांनी केले .
विद्यालयात दर्जेदार उपक्रम राबवले जातात दहावी परीक्षेत विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. शाळेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक आहे. असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी यांनी केले आहे
शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा ही दिल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर १५ जून पासून ग्रामीण भागात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. नवगतांचे स्वागत नवगतांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वागत आणि विद्यालयाचे सहशिक्षक अण्णाप्पा सातलगावकर यांनी केले. यावेळी पालक मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करत विद्यार्थी व विद्यार्थिनींचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. इयत्ता पाचवी ला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी आणि टाळ्याच्या गजरात केले. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत खीर विद्यार्थ्यांना देऊन पहिला दिवस गोड करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख युवराज होळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शुभांगी कारंजे यांनी मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश चव्हाण, गोरख जगताप, जगदेवी शंकर शेट्टी, विठ्ठल पाटील शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत