मूलभूत अधिकारांचा लाभ घेणारे देश कर्तव्या संबंधी गंभीर नाहीत त्यामुळं आज मूलभूत अधिकारांवर सरकार गदा आणत आहे !
विजय अशोक बनसोडे
मिथ्या धर्माभिमान आणि व्यक्तीपूजा बहुजन समाजाच्या येणाऱ्या तरुण पिढीला मानसिक व बौद्धिक दृष्ट्या गुलामचं करणार !
!! मुलभूत कर्तव्यांचा समावेश !!
संविधानाच्या भाग-चार (क) मधील अनुच्छेद ५१-क मध्ये आपणा सर्व भारतीयांची मुलभूत कर्तव्ये विस्ताराने दिलेली आहेत.संविधानात ४२ व्या घटनादुरुस्तीने अनुच्छेद-५१ (क) हा आपल्या संविधानाचा भाग बनवण्यात आलेला आहे.आपण आपले अधिकार आणि हक्क मागत असतांना देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची देखील जाणिव ठेवणे महत्त्वाचे आहे.अर्थातच ही संविधानिक कर्तव्ये इमानदारीने पुर्ण करणारेच खरे देशभक्त असतात.
हजारो वर्ष आपण माणूस असतानाही अस्पृश्यच होतो !
हजारो वर्षापासून भारतामध्ये माणसं “माणूस” असतानाही “अस्पृश्य” म्हणून विविध स्तरावरील गुलामी सहन करणाऱ्या देशातील जवळपास आठ हजार जातीच्या लोकांनी विशेषतः स्वतःला “हिंदू” म्हणून घेणाऱ्या हिंदू धर्मातील अनेक छोट्या मोठ्या जाती व उपजातीच्या सर्वसामान्य नागरिकांनी,लिहिता वाचता येणाऱ्या सर्व जन माणसांनी याचा विचार करावा की,काय आपल्याला या देशांमध्ये हजारो वर्ष वैदिक धर्म प्रणित चतुवर्ण्या व्यवस्थेने लादलेली गुलामी सहन करावी लागली,ती गुलामी भारतीय संविधानानेच नष्ट केली की अन्य कोणी ?
आपणास हजारो वर्ष धन विद्या आणि शस्त्र बंदी होती ती बंदी भारतीय संविधानाने उघडली !
हजारो वर्ष विविध स्तरावरली सामाजिक सामाजिक राजकीय शैक्षणिक गुलामी आपण सहन केली. ती आजही सहन करायची का ? हजारो वर्षाच्या विविध स्तरावरील गुलामीत आपण आपले जीवन व्यतीत केलं.अशा विशेषता “हिंदू” धर्मातील अनेक जाती समूहातील सुजान मतदारांनी आणि बुद्धिजीवी नागरिकांनी विचार करायला हवा की,आपण माणूस असताना सुद्धा हजारो वर्ष आपल्याला “धन-विद्या आणि शस्त्रबंदी” का होती ? आपण मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या तर काही जातींना शारीरिक दृष्ट्या सुद्धा गुलाम करत (अस्पृश्य) ठेवण्यात आलं होतं,ते का आणि कशासाठी ? या सर्व महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम भारतीय नागरिकांनी केलं पाहिजे.तरच आपल्या लक्षात येईल की,भारतीय संविधानाने किती मोठे उपकार आपल्यावरती केलेले आहेत.आपणास हजारो वर्ष धन-विद्या आणि शस्त्र बंदी होती ती बंदी भारतीय संविधानाने उघडली ! याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
आपण कर्तव्याप्रति गंभीरणा होत परिणामी आपल्या आर्थिक नाड्या व शैक्षणिक दार बंद केली जात आहेत !
आपणच निवडून दिलेलं “आपलं सरकार” आपल्या आर्थिक नाड्या बंद करते म्हणजे आपण देशा देशाप्रती असलेल्या कर्तव्याच्या बाबतीत गंभीर नाहीत,हे सिद्ध होते.भारतीय संविधानाच्या अवघ्या 70 वर्षांमध्ये आज भारतातील विशेषता हिंदूतील छोट्या मोठ्या जातीसमूहातील सर्वसामान्य गोर-गरीब नागरिकांनी जी प्रगती साध्य करून आज यशाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.ते मात्र इथल्या सनातनी व्यवस्थेच्या सत्ताधाऱ्यांना कदापि सहन होत नाही.आज संविधानाच्या अवघ्या 70 वर्षांमध्ये बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं बंद करण्यात आली.शिक्षणाचे खाजगीकरण,बाजारीकरून शिक्षण महागडे केले.सरकारी नोकऱ्या बंद केल्या.सरकारी योजना आणि उद्योग तोंड दाखले पणानेच मिळतात. एकूणच हिंदू म्हणून घेणाऱ्याच हजारो जाती आणि उपजातीच्या आर्थिक नाड्या बंद करण्याचे काम “जय श्रीराम” आणि “राम लल्ला” च्या घोषणा देऊन करण्यात येते.हे आपल्या का लक्षात येत नाही.
केवळ हिंदुत्वाच्या नावावर आपणच आपल्या तरुण पिढी तरुण पिढीचं जीवन बरबाद करत आहोत !
त्यामुळे आज विशेषतः 2024 मध्ये आपणच विशेषता “हिंदू” म्हणून घेणाऱ्या मतदारांनी गाव पासून ते दिल्लीपर्यंतची सरकारं कोणात्या विचाराची असावीत,याचे अधिकार आपल्याला असतानाही आपण केवळ वैयक्तिक जीवनातला धर्म सार्वजनिक जीवनामध्ये मांडून आपल्या येणाऱ्या पिढीचं बौद्धिक/शैक्षणिक नुकसान करत आहोत की नाही,याचा ही विचार आपण केला पाहिजे.अर्थात एक बाजूला आपण हिंदू असलेल्याचा मिथ्या धर्माभि मान बाळगतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याच पिढीच्या पायावर दगड मारून त्यांच्या भविष्यकाळाचा सत्यानाश करून घेत आहोत.हे आपल्या लक्षात का येत नाही. भारतामध्ये राहणारा बहुसंख्य हिंदू हा आज शिक्षण,उद्योग आणि नोकऱ्या पासून वंचित असताना सुद्धा आपल्याला हिंदू म्हणून हिंदूच्या जीवावर निवडून येणाऱ्या सरकारचा राग का येत नाही.
हजारो वर्ष जे अधिकार आपल्याला नव्हते ते अधिकार भारतीय संविधानाने दिले !
त्याचबरोबर आपल्याला हजारो वर्षात नसलेले सर्व अधिकार भारतीय संविधानाने या 70 वर्षात दिले तर आपण आपल्या प्रत्येकाने मनाला प्रश्न विचारला पाहिजे की आपण आपण उपभोगत असलेले मूलभूत अधिकार मागत असताना त्याच्यासाठी संघर्ष करत असताना किंवा विनसायास त्याचा लाभ घेत असताना.या भारत देशा प्रति आपली काही महत्त्वपूर्ण कर्तव्य सुद्धा आहेत याचा आपण विचार करतो का ? कारण आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1950 1949 ला सांगितल्याप्रमाणे भारताची लोकशाही लोकशाही आणि लोकशाहीचे कडवे समर्थन करणारी शासन व प्रशासन प्रणाली आपल्या सर्वांच्या अविचारी वागण्याने पुन्हा एकदा धोक्यात आली आहे.याची पुसदशी तरी कल्पना आपल्याला येत आहे का ? कारण काल परवा सुद्धा निवडणुका झाल्या आणि त्याच्या अगोदर ही निवडणूक झाल्या होत्या.आणि यानंतर येणाऱ्या काळात सुद्धा निवडणुका होणारच आहेत.आपण काय या निवडणुकांमध्ये आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो का ?
मिथ्या धर्माभिमान आणि व्यक्तीपूजा बहुजन समाजाच्या येणाऱ्या तरुण पिढीला मानसिक व बौद्धिक दृष्ट्या गुलाम करणार !
गावपातळीपासून ते देश पातळी पर्यंतची सरकारे निवडून देत असताना आपण देशाची एकता व एकात्मता,सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य याचे थोडे तरी आपल्याला भान असते का ? आज आपण जातवार विविध संस्था आणि संघटना काढून मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी आंदोलन करत असतो परंतु देशाचा आणि राज्याचा सरकार चालवण्यास मात्र लोकशाहीच्या विरोधकांना तिथे बसवत असतो,ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकतो का ? कारण आपल्या सर्वांना ज्ञात असलं पाहिजे की देशाचं आणि राज्याचे सरकार चालवणारी माणसंच भारतीय नागरिकांचा मूलभूत विकास करू शकतात.भारत देशाला जगाच्या तुलनेत यशाच्या उंच शिखराकडे जाऊन घेऊन जाऊ शकतात.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समता मुलक समाजाची निर्मिती करू शकते.देशामध्ये राजकीय समानते बरोबर सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करू शकतात. परंतु आपल्याला मात्र याचं काही देणं घेणं नसतं.आपण आपल्यावर लादलेल्या रूढी-परंपरा, रिती-रिवाज,धर्म तत्वज्ञान यामध्येच मशगुल होऊन मिथ्या धर्माभिमान आणि व्यक्तीपूजेच्या नादात आपण हजारो वर्षापासून भारताला असलेल्या परिवर्तनवादी महापुरुषांची विचारधारा सोडून ज्यांनी आपल्याला हजारो वर्ष गुलाम करून ठेवले,अशा सनातनी आणि वैदिक विचारधारेचे समर्थन करण्यातच धन्यता मानत असतो.आपल्या सर्वांची हीच मानसिकता येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीला अपंग आणि मानसिक व बौद्धिक दृष्ट्या गुलाम बनवणार आहे.हे आपण नीटपणे ध्यानात घेतलं पाहिजे.
विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
X
???? मिथ्या धर्माभिमान आणि व्यक्तीपूजा बहुजन समाजाच्या येणाऱ्या तरुण पिढीला मानसिक व बौद्धिक दृष्ट्या गुलामचं करणार !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत