डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत धम्मक्रांतीची पांच सूत्रे
भदंत विमलकीर्ती गुणसिरी
————————————- बुद्धधम्माची दीक्षा घेण्यापासून हिंदू धर्मातील समजूतींचा नाश होऊ शकतो. पहिली म्हणजे जाती-धर्म पाळणे म्हणजेच पुण्य आणि जातीभेद मोडणे म्हणजे पाप ही समजूत निकालात निघू शकते. दुसरी म्हणजे धर्मांतराला पाप समजण्याची समजूत नष्ट होऊ शकते. तिसरी म्हणजे जन्माने धर्म लागल्याची समजूत नष्ट होऊ शकते. या समजूती एकदम नष्ट नाही झाल्या तरी त्यांना प्रचंड धक्का बसतो आणि त्यांना मानणारा माणूस किमान विचार तरी करायला लागतो. अशाप्रकारे माणसाला विचार करायला भाग पाडणे म्हणजे त्याला आपले नैसर्गिक बुद्धिबळ वापरण्यास सक्षम करणे होय. त्याचे डोळे उघडण्यास मदत करणे होय. जेव्हा बौद्ध कुटुंबातील एखाद्या मुला मुलींची धम्मदीक्षा होईल, तेव्हा त्यांचे शाळेतील मित्र मैत्रिणी त्यांना विचारतीलच की, का रे! तुम्ही बौद्ध कुटुंबात जन्माला असल्यामुळे जन्माने बौद्धच आहात मग धम्मदीक्षा घेऊन पुन्हा बौद्ध बनवण्याची काय गरज आहे? तेव्हा ते त्यांना सांगतील की आमच्या धम्मात जन्माने जात धर्म चिटकवला जात नाही. तो मानवी स्वातंत्र्यावर घाला ला आहे. ज्याने त्याने समजून आपणाला हवा तो धर्म अगदी कसोटीला लावून तपासून घ्यायचा असतो. तेव्हा त्याचे मित्र मैत्रिणी विचार करायला लागल्या वाचून राहू शकत नाहीत त्यांच्यापैकी कोणीच आपला धर्म आणि जात स्वतः निवडलेली नसल्यामुळे आणि उच्च वर्णीय सोडून बहुजन समाजातील अनेकांना आपली जात अडवत नसल्यामुळे तो प्रत्येक माणूस विचार करायला लागल्याशिवाय राहणार नाही. तसेच जन्माने माणसास जात धर्म चिटकिविल्याने माणसावर किती अन्याय होत असतो, याचा बौद्धांनी प्रखर प्रचार चालू ठेवला तर त्याचे दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे बहुजन समाजात जागृती होऊन तो आपल्या बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या प्रयत्नाला लागल्याशिवाय राहणार नाही. आपल्या उदाहरणातून इतरांना प्रेरणा देण्याचे हे महत्त्व कार्य आहे. ते बौद्धांनी पुन्हा जोमाने हाती घेणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील सात वर्षावरील कळत्यावयातील प्रत्येक मुला-मुलीला धम्मदीक्षा देण्याचा उपक्रम राबवावा. ब्राह्मणाच्या शिकवणीला बळी पडून त्यांच्या चालीवर आपल्या मुलाबाळांना जन्माने बौद्ध म्हणणे हा घोर अन्याय तसेच घोर अज्ञान आहे. हे लक्षात घ्यावे. धम्मदीक्षेतून मुला-मुलींमध्ये जागृती होऊन ते धम्म शिकविणीच्या आपल्या विकासासाठी आणि अधिक सुख समाधानीचे व अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी वापर करण्यास सिद्ध होईल, बौद्धिक गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त होईल. हेही लक्षात घ्यावे. सर्व प्रकारच्या गुलामगिरीची जननी म्हणजे बौद्धिक गुलामगिरी होय. व्यवहारात स्वातंत्र्य असला तरी बुद्धीने गुलाम असलेलाच खरा गुलाम असतो . आज भारतातील बहुसंख्य लोक जाती-धर्माचे आणि रूढी परंपरांचे मनाने गुलाम आहेत. या गुलामांना आपण गुलाम आहोत. हेच कळत नाही. त्यांचे डोळे उघडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा नेत्र दीपक समारंभ घडवून आणला होता. हे लक्षात घ्यावे. हे त्यांनी फुकलेले समग्र क्रांतीचे रणसिंग होते. धमक्रांतीचा धम्म घोष होता. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेणारे सात लक्ष लोकांनी आणि चंद्रपूरच्या धम्मदीक्षा घेतलेले दीड लाख लोक हे त्यांचे क्रांतिकारक सैन्य होते. परंतु बाबासाहेब गेल्याबरोबर त्या क्रांतिकारक सैन्यांची धूळधाण झाली, इतकी की आज कोणताही बौद्ध स्वतःला क्रांतिकारक समजत नाही आणि त्या धम्मक्रांतीसाठी झटत नाही. नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत आणि उच्च शिक्षतांपासून अशिक्षितआतापर्यंत आणि श्रीमंतांपासून गरिबापर्यंत कोणालाही वाटत नाही. की धम्मक्रांतीकारक आहोत. म्हणून कसोसिने धम्म-जीवन जगण्यात आपण अग्रसर असले पाहिजे. धम्म-जीवन हे क्रांतिकारकांचे जीवन आहे. ते आपल्या मुलाबाळांना दिले पाहिजे ते त्यांना निष्ठेने जगायला शिकविले पाहिजे. परंतु आंबेडकर अनुयायांनी या उलट वागून धम्मदीक्षा बंद केली क्रांतिकारक निर्माण करण्याचे कार्य बंद केली. ही चूक त्वरित सुधारली पाहिजे आणि धम्मदीक्षेचे जंग छेडले पाहिजे. समाप्त.
पोस्ट नंबर दुसरे सूत्र उद्या पहा.
भदन्त विमलकीर्ती गुणसिरी.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””
धम्म प्रसारक बाळासाहेब ननावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत