भगवान बुद्धांची विचारधारा…..

सुरेश भवर
. बारा दुवे.
. पहिला अज्ञान
जे संसारातील सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. अर्थात अविद्या याचा अर्थ काही न बघणे यातून मनाचे धुसर व भ्रमित असणे ध्वनीत होते. अज्ञान म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी खूप वेळ आणि शक्ती हवी म्हणून आपण केवळ मुख्यत्वांवरच लक्ष देऊया!
जेव्हा आपण एखादे प्रवचन ऐकण्यासाठी जातो तेव्हा आपला उद्देश एकच असतो की, मी प्रवचनातून मिळालेली शिकवण अमलात आणि
तपासून घेईल. तेव्हा आपण असा विचार करतो की तेव्हा ‘मी’ वर आपला भर असतो. मी विषयक आपल्या काही विशिष्ट संकल्पना असतात. त्याला धम्मात अहंकार म्हटले जाते. आपला हा अहंकार सतत आपल्या सोबत असतो आणि कधी कधी तो जास्त ठळकपणे दिसून येतो, जसे तेव्हा आपल्याला एखाद्या अत्यंतिक आनंदाच्या किंवा एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते, अशावेळी आपली स्वताची जाणीव अधिक तीव्र बनते आणि नेहमीपेक्षा अधिक स्पष्टपणे जाणवू लागते.
आपण सारेच स्वतःविषयीच्या काही विशिष्ट संकल्पना बाळगून असतो. लांब लचक, विशेष सिद्धांतिक असे काहीही कारण न देता देखील आपण हे सहज अनुभवू शकतो. जेव्हा आपला अहंकार हा अधिक तीव्र स्वरूप धारण करतो, तेव्हा जणू काही आपल्यात भरीव व स्पष्ट आणि अनियंत्रित अशा स्वरूपात तो आहे असे आपल्याला जाणवते. हेच आणि असेच भ्रम आपण स्वतःबद्दल भ्रम निर्मित करतो म्हणूनच आपण खरेच स्वतःला जे समजतो ते आहोत का, या विषयावर ध्यान करणे आवश्यक ठरते. जर आपण स्वतःच्या आत अगदी डोक्या पासून ते पायाच्या बोटापर्यंत जर हे आपले स्वरूप शोधायला गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की, आपले संपूर्ण शरीर किंवा शरीराचा कुठलाच विशिष्ट भाग आपल्या अहंकाराचे समर्थन करत नाही. आपली हाडे मास मज्जा व अवयव काहीही आपल्या अहंकाराला पोसत नाहीत अहंकाराचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्यांच्यात अवगुण्य क्रिया होतात.
त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मनाचा अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षात येते की,मन म्हणजे आहे तरी काय? केवळ निर निराळ्या विचाराचा एक अखंड प्रवाह, ज्यामध्ये आपल्याला अहंकाराचे अस्तित्व दिसून येत नाही याचाच अर्थ अशी कुठलीच गोष्ट जी आपल्या शरीरात आणि मनात अस्तित्वात नसल्याचे प्रतीत होते, पण अहंकार अस्तित्वात नसणे हा काही निष्कर्ष निघू शकत नाही कारण आपण अहंकाराच्या अस्तित्वाविषयी विश्लेषण करत आहोत.
ही परिस्थिती फार सुक्ष्म आहे. अज्ञान जसा सोपा विचार करते तसे आपण अस्तित्वात नसतो. मग आपल्याला सत्य स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी आपल्याला विशेष प्रकारचे प्रशिक्षणाची आणि अविरत प्रयत्नाची गरज असते.
आपल्या मनात आपण स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्या धारणा बाळगलेल्या असतात त्यालाच बौद्ध धम्मात अज्ञान असे म्हटले जाते. जे परस्पर मूलस्थानाच्या साखळीतील पहिला दुवा समजला जातो.
दुसरा दुवा अंतर्मन
आपल्या मनात सतत जात राहणाऱ्या विचारांचा प्रवाह हाच आपल्या कर्माचे स्वरूप ठरवत असतो. संसारी दुःख आणि त्याची कारणे यांच्या परस्पर संबंधातील शृंखलेतील हा दुसरा दुवा आहे. अंतर्मन पटल आपल्या कर्माचे ठसे सोबत घेत असते आणि योग्य वेळी त्या कर्मा ला परिपक्व होण्यास मदत करते, जसे बीज जमिनीत पेरल्यानंतर ते पिकातील एका रोपाच्या स्वरूपात प्रगतीकरण होण्यासाठी कारण बनत असते. बीज केवळ मातीत पेरून भागत नाही तर ते योग्यपणे रुजण्यासाठी योग्य हवा पाणी लागते आणि खत लागते तेव्हा कुठे ते रुजते वाढते आणि फळ देते.
अभिलाषा हा तिसरा दुआ आहे. ज्यामुळे व अज्ञानामुळे आपल्या मनपटलावर कर्माची जी बीज आपण पेरलेली असतात अशा मोहालाच अभिलाषा म्हटले जाते, जी संसारीक दुःखे आणि त्यांची कारणे यांच्या परस्पर संबंधातील शुंखलेची तिसरी कडी आहे.
हाव हा चौथा दुवा आहे. आपल्या विचारप्रवाहात आणखी एका प्रकारचा मोह असतो त्याला हाव असे म्हटले जाते अर्थात सतत अधिक आणि अधिक काहीतरी मिळवण्याची इच्छा यालाच हाव म्हणतात. अज्ञानामुळे यात अधिकच भर पडते, कर्माला स्वरूप बनवण्यात या चौथ्या दुव्याचा मोठाच हातभार लागतो.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस याचे प्रगटीकरण होते आणि आतापर्यंतच्या आपल्या कर्माचे स्वरूप बघून आपल्या पुनर्जन्म आपल्या सोबत कुठली कर्मे येणार ते ठरते. अभिलाषा आणि हाव हे जरी मोहाचेच प्रकार असले तरी प्रत्येकाच्या मागच्या क्रिया वेगवेगळ्या असतात. तर दुसऱ्यामुळे कर्मफलाचे संपूर्ण पक्व स्वरूप आपल्या पुनर्जन्माचे स्वरूप ठरवते.
मार्गस्थ होणे
मार्गस्थ होणे हा या शृंखलेतील पाचवा दुवा आहे. आयुष्याच्या शेवटी आपले कर्म त्याच्या फलस्वरूपानुसार आपल्याला पुढील जन्मात ढकलते. आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी उद्भवणाऱ्या या विशिष्ट मानसिक क्रियेला मार्गस्थ होणे असे म्हटले जाते.
संसारी दुःख आणि त्यांच्या कारणाशी परस्पर संबंध सांगणारे पाच दुवे जीवनाशी संबंधित असतात; पण हे आवश्यक नाही की, याच काळात त्याचे प्रगटीकरण आपल्या दृष्टीस पडेल. काही वेळा या जन्मात तर अनेकदा भविष्यातील जन्मात त्या व्यक्त होतात.
जसजशी आपली मृत्यू घटिका जवळ येते तसे आपले मन आणि शरीर क्षीण होत जाते. शारीरिक अवस्था आणि मनाची स्थूल अवस्था जोपर्यंत आपण अशा एका विशिष्ट मानसिक पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत विरल होत जाते, जिथे आपल्याला सगळे काही स्वच्छ व स्पष्ट असे जाणवू लागते.
ही आपल्या जीवनाची अंतिम अवस्था असते, मृत्यूची साक्षात जाणीव! आपण हे अवस्थेत काही विशिष्ट काळासाठी राहतो. काय वेळाने थोडीशी हालचाल होती आणि आपण मनाच्या एका अशा पातळीवर जातो जी एक दरम्यानची अवस्था असते. आपले मन आपले शरीर सोडून बाहेर पडते आणि आपण मृत्यू आणि पुनर्जन्म या मधल्या अवस्थेत पोहोचतो. या अवस्थेलाही आपला असा एक देह आणि मन असते; परंतु आपले शरीर जसे पंचतत्वांनी बनले आहे तसे मनाचे नसते.
पुनर्जन्म…
ज्या क्षणी हवा पंचतत्व सह देह सोडते त्या क्षणी मातापित्यांचा संयोग झालेल्या पेशी मध्ये पुनर्जन्माचा दुवा जन्म घेतो. ही सहावी अवस्था आहे. मात्यापित्यांचा केवळ संयोग होणे पुरेसे नाही हे वर सांगितलेच आहे. मातेचे गर्भाशय देखील गर्भधारणेसाठी सर्व तऱ्हेने सक्षम असले पाहिजे. माता पिता आणि गर्भ यांच्या कर्माचा परस्पर संबंध जुळून यायला हवा. ही सर्व परिस्थिती जुळून येत असेल तरच पुनर्जन्म घटित होतो.
( यात नमूद केलेला पुनर्जन्म हा बौद्ध धम्मा प्रमाणे आहे याची सविस्तर माहिती बुद्ध अँड हिज धम्मा ह्या ग्रंथात सुद्धा नमूद केलेली आहे.)
बाकी माहिती पुढच्या वेळेस बघू…
————————‐—-
भगवान बुद्धांची विचारधारा….
प्रसारित: सुरेश भवर नाशिक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत