जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल : – डी टी गायकवाड

नळदुर्ग येथे १० वी व १२ वी मध्ये गुणवंता प्राप्त विद्यार्थांचा गौरव सपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे खुप महत्त्व आहे शिक्षण हे आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असून शिक्षण यंत्राचा विद्यार्थांनी पुरेपूर उपयोग करावा शिवाय स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे खूप मोठे साधन या शिक्षणा मुळे सामाजिक आणि कौटोंबिक ही आदर ही वाढतो यासाठी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्या जीवनात शिक्षणा विषयी प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनावे म्हणून जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन विद्रोही साहित्यिक डॉ डी टी गायकवाड यांनी केले .
नुकताच नळदुर्ग येथे जनसेवा बहुउदेशिय शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्ग पुणे यांच्या वतीने १० व १२ वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित केला होता त्या वेळेस ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा राज सोनकांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ गौतम गायकवाड , पोलीस उप निरीक्षक इश्वर नांगरे , नळदुर्ग आणि परिसरात साहित्यिक , एक उत्कृष्ठ निवेदक , पत्रकार , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी वऱ्हाडे हे होते .
समाजातील वरिष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाने शिक्षीत बनतो शिक्षण देणारी सर्व मंडळी हे आपले शुभचितंक आसतात परंतू चांगल्या विचारांच्या पाऊल खुणा शिक्षणाच्या दिशेने घेऊन जातात त्या पाऊल खुणा विद्यार्थाने प्रामाणिक पणे स्विकाराव्या विचाराने विचार बदलतात , बदलाने बदलाव होते आणि तो बदल आम्हाला विद्यार्था मध्ये बघायचा आहे आसे परखड मत नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक इश्वर नांगरे यांनी केले .
यावेळी राज्यस्तरीय उत्कष्ठ पुरस्कार प्राप्त प्रा गौतम गायकवाड यांना संस्थेच्या वतीने पैलवान रेवाप्पा सोनकांबळे प्रतिष्ठान आयोजित समाज भुषण पुरस्कार व भारतीय संविधानाचा ग्रंथ सन्मान करण्यात आला . यावेळी सन्मानपत्राचे वाचन रि पा इं चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले .डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश स्कूलचा १००% निकाल लागल्याने संस्थेचे १९ विद्यार्थी गुणवत्ता मिळविले आहे संस्थेचे संस्थापक मुख्य प्रवर्तक मारुती खारवे यांचे व त्यांच्या विद्यार्थांचे कौतुक व अभिनंदन केले आहे .
सेवानिवृत मुख्याध्यापक कैलास गवळी , सेवानिवृत्त प्रा डॉ महादेव गायकवाड , सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी आपपले मनोगत व्यक्त केले .ज्याना नुकताच पैलवान रेवाप्पा सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने समाज भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला ते सामाजिक कार्यकर्ते बंडु पुदाले , आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , आर पी आय चे जिल्हा सचिव एस के गायकवाड , सा नळदुर्ग टाईम्स नळदुर्ग लाईव्ह चे मुख्य संपादक पत्रकार दादासाहेब बनसोडे , आदिजनांच्य उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय उपयोगी वस्तुचे वाटप करून बौद्ध संस्कारा साठी संस्कार विधिचे पुस्तक देऊन व डॉ डी टी गायकवाड व प्रा गौतम गायकवाड लिखीत पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती उमरगा येथील सांखिकी विस्तार अधिकारी राहुल सोनकांबळे , सुधाकर सोनकांबळे , धर्मा सोनकांबळे , वैशाली माने पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने बालीका सोनकांबळे , अदिनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर पी आय चे जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार कैलास गवळी यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत