कधी हिंदू तर कधी संविधान खतरेमे?

गणपत गायकवाड नांदेड
स्वतंत्र बाण्याच्या, स्वाभिमानी वंचितवर प्रेम करणाऱ्या करोडो आंबेडकरवादी मित्रांनो आपण सारे गेल्या चाळीस वर्षांपासून एका षडयंत्राचे शिकार होत होत…. कधी हिंदू खतरेंमे हैं म्हणून bjp वाले सत्तेत येतात तर कधी संविधान खतरमे हैं म्हणून काँग्रेसवाले सत्तेत येतात या दोघांच्या खेळत सत्तावंचिताना कायम सत्तेपासून जाणीव पूर्वक दुर्लक्षित करण्यात येते.. हिंदू खतरेमे हैं म्हणून सत्ता हडप केली जाते आणि आपल्या परिवारात वाटून घेतली जाते. परिवाराच्या बाहेर एकाही गरीब हिंदुला सत्तेत वाटा मिळू दिला जात नाही.त्यांची मते मात्र हडप केली जातात. याच्या उलट संविधान खतरेमे हैं म्हणून सेक्युलरवाले सत्तेत येतात आणि सत्ता आपल्या परिवारात वाटून घेतात… हा खेळ मागच्या चाळीस वर्षांपासून चालू आहे.. या दोघांच्या खेळात तिसऱ्याला प्रवेशच मिळू दिला जात नाही… तिसरा पक्ष तुल्यबळ होऊ लागला तर त्याची सालगडी लावून बदनामी केली जाते… मग युती करा युती करा असा कांगावा केला जातो.. युती म्हणजे नेमकं काय असतं. 46+2 म्हणजे युती असते का? किंवा 280+8 म्हणजे युती असते का? युतीत थोडी तरी सामान न्यायाची, एकमेकांच्या मानसन्मानाची काळजी घेणारी असावी लागते. मालक उंटावर बसून पैदलवाल्याला म्हणतात, युती करू आणि सहा महिने बोलतच नाही. फॉर्म भरणे सुरु झाले की आपापल्या जागा फिक्स करतात आणि ज्या जागेवरून अजिबात निवडून यायची शक्यता नाही ती जागा दिली,दिली म्हणून मीडियावर येऊन ढिनडोरा पिटतात…. त्यांची इच्छा असते की आंबेडकरी समूह फरपटत त्यांच्या मागे लागला पाहिजे.. एखादा तुकडा भिरकावतात आणि येऊ वाटलं तर या नाही तर तुम्हाला B टीम म्हणून बदनाम करू असे धमकावतात…. कालचा निकाल पहिला तर सरासरी पाच लाख मते घेणारा उमेदवार निवडून आलेला आहे. महाराष्ट्रात वंचिताचे एक कोटीच्या वर मतदार आहेत. त्यापैकी 60% टक्के ही मतदान झाले तर किमान 12 सीट त्यांच्या वाट्याला आल्या पाहिजेत. 12 नाहीत तर नाहीत किमान सहा सीट तरी मिळाव्यात की नाही? त्यांना वाटते बाळासाहेब केवळ अकोला घेऊन चूप बसावं आणि सर्व रान काँग्रेस साठी मोकळे सोडावे… बाळासाहेबांनी त्यांचा पक्ष गुडाळून ठेवावा. काँग्रेस च्या सावलीत रहावे आणि अकोल्यात स्वतःला बंदिस्त करून घ्यावे…. बाळासाहेबांची सगळीकडून नाकेबंदी केली जाते… बाळासाहेबांना हा भिकारचोट सौदा पटत नाही…. ते स्वतंत्र मार्ग निवडतात… मग बाळासाहेब संविधान विरोधी आहेत, गर्विष्ठ आहेत, हेकेखोर आहेत अशा अफवा उडवितात.. काही पाकीटमार टमरेलाना कामाला लावले जाते. सुपारी घेऊन हे काँग्रेस चे दलाल जिवतोड बदनामी करतात…. काँग्रेस ला संविधान आणि संविधानवाद्यांची हमदर्दी असती तर 1956 ला घटनेत बदल करून धर्मांतर करणाऱ्या बौद्ध समाजाचे आरक्षण घालविले नसते…संविधानाविषयीं आस्था, आदर असणाऱ्या काँग्रेस ने आतापर्यंत एकूण कितीवेळा घटनेत बदल केला? हे टमरेल विचारवंत मंडळीना कळत नाही?
वंचित संपली वंचित संपली असा भोंगा लावून ओरड करणाऱ्यांना मी चॅलेंज केलेलं होत की तुम्ही 17 C आणि EVM चे आकडे जुळवून दाखवा. आम्ही वंचितची मते कुठे ट्रांसन्फर झाली हे दाखवून देतो…पण अजून कोणीही
हे चॅलेंज स्वीकारले नाही…
EVM मध्ये काहीच गडबड नाही EVM निर्दोष आहे हे तुम्ही मान्य केलं का? यावर ही कोणी उत्तर दिलं नाही……
मित्रांनो हे पाकीटमार दलाल विचारवंत काँग्रेस ची दलाली घेऊन वंचित संपली म्हणून कितीही टिरी बडवून घेत असले तरी वंचित संपलेली नाही. निवडणूक हरली म्हणजे पक्ष संपत नसतो. मागच्या लोकसभेत महाराष्ट्रातून काँग्रेस चा एक ही खासदार नव्हता. आता 10-12 पुन्हा निवडून आले. आपणही अशावादी राहूया.
केवळ निवडणूकिसाठी संघटन नसते. तर संघटन एक सामाजिक प्रोटेक्शन आहे…. निवडणूकीपेक्षा समाजाच्या सुरक्षिततेसाठी संघटन मजबूत असणे गरजेचे आहे… जेव्हा कुठे समाजावर अत्याचार होतो तेव्हा कोणता सेक्यूलरवादी पुढे येत नाही ना पाकीटमार टमरेल विचारवंत पुढे येत नाहीत…..
राजगृह हीच समाजाची ढाल आहे.. कवच आहे, तटबंद आहे. तिच्या आड आपण सुरक्षित आहोत आणि टमरेल विचारवंत सुद्धा सुरक्षित आहेत….. एवढे लक्षात असुद्या
गणपत गायकवाड नांदेड
9527881901
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत