रिपब्लिक विचारधारा ही मनुष्यक्रांतीचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान

रमेश जीवने
रिपब्लिक विचारधारा ही मनुष्यक्रांतीचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान असल्यामुळे जगातील सर्वाधिक राष्ट्रांनी आम्ही रिपब्लिकन आहोत, आमचे राष्ट्र हे रिपब्लिक राष्ट्र आहे. आमच्या देशाचे संविधान रिपब्लिक आहे असे गौरवाने घोषीत केले. या रिपब्लिक विचाराचे जनक तथागत बुद्ध असून तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशीला या जग प्रसिध्द बौद्ध विद्यापीठातून भिक्खु संघाने रिपब्लिक विचारधारा जगात प्रसारीत केली.
डार्विन, कोपर्निकस, गॅलीलीओ या जग प्रसिध्द वैज्ञानिकांनी बुद्धाचा उत्क्रांतीवाद जगात स्थापीत केला तर बुद्धाच्या रिपब्लिक क्रांती सुत्रावर सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल या प्राचीन ग्रीक विद्वानांनी रिपब्लिक या नावाचे अनेक ग्रंथ लिहीले. परिणामी जगात रिपब्लिकन क्रांतीने जन्म घेतला.
ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या विरोधात अमेरीकेने १७७६ मध्ये राज्यक्रांती केली व युनायटेड स्टेट ऑफ अमेरीका हे जगातील पहिले रिपब्लिक राष्ट्र स्थापीत केले. अमेरीकेचे संविधान रिपब्लिक आहे, त्या देशात रिपब्लिकन पक्ष आहे.
भारताचे संविधान हे सुध्दा रिपब्लिक असुन देशात २६ जानेवारी हा दिवस आम्ही REPUBLIC DAY म्हणुन साजरा करतो व त्या दिवसाला संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन रिपब्लिक भारत घडविण्याची शपथ घेतो. त्या रिपब्लिक विचारधारे पासुन आज आम्ही वंचित झालो व स्वत:हाला बहुजन मूलनिवासी म्हणु लागलो परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला रिपब्लिक स्वातंत्र्याचा दर्जा मिळावा या करीता संविधान मसुद्यात भारताला सार्वभौम लोकशाही गणराज्य SOVEREIGN DEMOCRATIC REPUBLIC घोषित केले आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी त्या आशयाचे पत्र लिहिले व ब्रिटीश राष्ट्रसंघ BRITISH COMMONWEALTH संबंधाचा प्रश्न सोडविण्याची हमी घेतली.
परिणामी ब्रिटिशांना २८ एप्रिल १९४९ रोजी लंडन घोषणा पत्राप्रमाणे ब्रिटिश कॉमन वेल्थ हे नाव रद्द करुन कॉमन वेल्थ नेशन्स असे नाव धारण करावे लागले. मनुष्य क्रांतीचा सर्वोच्च अविष्कार असलेल्या रिपब्लिक तत्वज्ञानाच्या क्रांतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. त्याची उद्दघोषणा ३ आक्टोंबर १९५७ ला नागपूरात करण्यात आली.
भारतीय संविधानाचे ध्येय व उद्दिष्टे हि RPI चे ध्येय व उद्दिष्टे असल्याचे RPI च्या संविधानातील कलम २ मध्ये स्पष्ट केले व RPI च्या संविधानातील कलम २३ प्रमाणे देशाच्या राष्ट्र ध्वजावर स्थापीत असलेले जे अशोकचक्र आहे ते RPI च्या निळ्या ध्वजावर विराजमान केले. ध्वज हे धर्माचे, संस्कृतीचे, सत्तेचे, क्रांतीचे वाहक असल्याने सर्वच सामाजिक संस्था, संघटना, राजकिय पक्ष व जगातील राष्ट्रे आपआपल्या ध्वजाचा सन्मान राखतात. ध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी समर्पितपणे लढतात व प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात.
अशोक चक्रांकीत निळाध्वज हा रिपब्लिकन क्रांतीचा संदेश वाहक असल्यामुळे तो आंबेडकरी चळवळीच्या अग्रभागी डौलाने फडकतो. तो केवळ आकाशात उंचावून प्रदर्शित करण्यासाठीचा तो कापडी रंगाचा तुकडा नाही तर आमच्या अस्मितेचा व विद्रोहाचा क्रांतीघोष आहे. निळाध्वज हा RPI साठी धम्मनायक सम्राट अशोका प्रमाणे सर्वव्यापी सत्ता स्थापीत करण्याची प्रेरणा व शेकडो शतकांच्या गुलामगीरीची शृंखला तोडणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकिय क्रांती लढ्याचा तो ऐल्गार आहे.
दास्यांत्ताच्या क्रांतीरोहणासाठी आपले जीवन समर्पित करणारे युगनायक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पार्थिव शरीरावर पक्षाचा निळाध्वज पांघरुण त्यांच्या स्मृतीला व कार्योला अभिवादन करण्यात आले.
आंबेडकरी आंदोलनात निळ उधळणारे, निळ्या पताका लावणारे आणि RPI च्या अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या व शहिदांच्या मृत देहावर देखील निळ्यारंगाची शाल ओढून त्यांना गौरवांकीत, सन्मानित केल्या जाते. परंतु या राजकिय नैतिकतेच्या निळाईची अभिव्यक्ती नाकारुन बाबासाहेबांनी सांगीतलेल्या रिपब्लिक क्रांतीच्या महानतेपासुन वंचित झालेल्यांनी बहुजन, मूलनिवासीचे माहात्म्य सांगत पक्ष बदलले पक्षाचे झेंडे बदलले व स्वनिर्मित पक्षाचे रंगी बेरंगी झेंडे निर्माण केले.
धम्म क्रांतीचे प्रतिक असलेल्या RPI चा अशोक चक्रांकीत निळाध्वज नाकरणे म्हणजे बौद्धमय भारतच्या बाजूने लढणाऱ्या RPI व त्या पक्षाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाहीच्या यशस्वीते करीता सुरु केलेली जाती निर्मूलनाची चळवळ नष्ट करुन बहुजन मूलनिवासी या संकल्पना राबविणे हे जातीय राजकारणाच्या नव ब्राम्हणशाहीच्या प्रतिक्रांतीचे बळी ठरणे असून आंबेडकरी चळवळीतील जात्यंत्तक क्रांतीच्या नायकांनी अशा अपप्रचाराला बळी न पडता रिपब्लिकन क्रांतीसाठी संघटीत होऊन बाबासाहेबांची RPI उभी करणे ही काळाची गरज आम्ही लक्षात घेतली पाहिजे
प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत तथा डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण साहीत्य छापले जावे म्हणून यवतमाळ ते नागपूर विधान सभेवर पायी मोर्चा काढणारे आंबेडकर मार्च चे प्रणेते माननीय रमेश जीवने 9881820239
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत