वंचितांची मते EVM ने पळविली ?


गणपत गायकवाड नांदेड
वंचितांची मते EVM ने पळविली आणि हिम्मत टमरेलानी
वंचितवर प्रेम करणाऱ्या स्वाभिमानी आंबेडकरवादी मित्रांनो षडयंत्रकारी व्यवस्थेने काटकरस्थान करून आपापसात मतांची लूटमार केलेली आहे. तिसरा स्पर्धक नको …जे आहे ते आपापसात अळीपाळीने वाटून घेऊ हे वरच्या स्थरावर ठरलेले आहे. त्यासाठी जिथे जिथे तिसरा स्पर्धक स्ट्रॉंग आहे त्यांच्या मताची पळवापळवी करून तिसरा स्पर्धक स्पर्धेतून बाद केलेला आहे. साधी गोष्ट आहे. एकावेळी आपण कोणतीही एक भूमिका घेऊ. प्रकाश असेल तर अंधार नसला पाहिजे किंवा अंधार असेल तर प्रकाश नसला पाहिजे. पण दोनीही गोष्टी एका वेळी अस्तित्वात नसतात. . एक तर जनमताचा कौल विरोधकांच्या बाजूने आहे म्हणा किंवा EVM निर्दोष आहे तरी म्हणा. एका बाजूला म्हणता जनमत आमच्या बाजूने आहे. आणि दुसऱ्या बाजूला EVM च्या विरोधात कोर्ट कचेऱ्या करता…..?……… हेराफेरी!!!!
दोन्ही पक्षातील प्रस्थापिताना वंचित समूहाची लीडरशिप डेव्हलप होऊ द्यायची नाही… एखाद्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी कोणी पुढे आला तर त्याची नाकेबंदी केली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर दुसरा आंबेडकर निर्माण होऊ नये म्हणून बदनामी, भुलथापा टवाळकी इत्यादी अस्त्र वापरले जातात. पेरलेली माणसे नेमके हेच केलेलं आहे…बाळासाहेब आंबेडकरांनी प्रदीर्घ संघर्ष करून मातीत गाढलेला काँग्रेसी मुर्दा मसनातून काढून पुनर्जीवीत करण्याची माकड चेष्ठा टमरेल विचारवंत नी केली आहे….
वंचिताचे मनोबल तोडण्याचा जीवतोड प्रयत्न चालू आहे… जेव्हा पराजित सैन्य लढण्याच्या मनस्थितीत नसते तेव्हा त्यावर अधिक वेगाने हल्ले करा म्हणजे त्यांना जेरबंद करून गुलाम करणे सोपे असते
अगदी याच नितीचा वापर करून हे टमरेल विचारवंतांचे वंचिताचे मनोबल तोडून त्यांना काँग्रेसचे गुलाम बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत..
जे जे आज वंचित विषयी अपप्रचार करीत आहेत ते कधीच आपले मतदार नव्हते,हितचिंतक नव्हते. ते सारेच्या सारे काँग्रेस ने फेकलेल्या तुकड्यावर आपला पिंड पोसणारे पोटभरू आहेत. त्यांच्या कांगाव्याकडे लक्ष न देता आपणास आपले मनोबल वाढवून येणाऱ्या विधानसभा निवडणूकीची तयारी केली पाहिजे…..15 लाखाचे 50 लाख करण्याची धमक आपल्यात आहे. फक्त आपली हिम्मत, साहस, मनोबल मजबूत ठेवा….. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही….
एक विचारवंत म्हणाले, “आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. तम्ही आम्हाला पॉकेटमार टमरेल म्हणता?”
मी म्हटलं,
मोले घातले रडायला
नाही असू नाही माया
पॉकेट घेऊन दिलेल्या भाषणाला तुम्ही विचाराची पेरणी म्हणत असाल तर तुमची पेरणी तुम्हाला तुम्हाला लखलाभ
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ही टमरेल मंडळी युती तोडली म्हणून अगपाखड करीत आहे यापैकी एकात तरी हिम्मत आहे का की आघडीच्या मगृर पणामुळे युती तुटली म्हणण्याची?
बाळासाहेबांना जसा सल्ला देत होते तसा सल्ला यांनी आघाडीला दिला का? हिम्मत करून कोणी सल्ला दिला तरी या टमरेलांचा सल्ला मानला जातो का?
विचाराची पेरणी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून गेली फक्त रोपटे उगवायला वेळ आहे. ज्या दिवशी शेतात तासातासांनी ही रोपटी उगवतील त्या दिवशी पॉकेटमार विचारवंत नावाचा कुंदा खनून खनून काढला जाईल.
मित्रांनो सारा खटाटोप आता वंचिताचे मनोबल तोडण्यासाठी चाललेला आहे. यांच्या ओरडण्याकडे लक्ष न देता हिम्मतीने येणाऱ्या काळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया....जयभीम
गणपत गायकवाड नांदेड
9527881901
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत