महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस “बौद्ध स्वाभिमान दिन” म्हणून साजरा


भय्यासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन बौद्धाचार्य दिन म्हणून साजरा होणार.
मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 89 वा वाढदिवस दि 5/5/2024 रोजी डॉ आंबेडकर भवन, दादर व राजगृह,दादर (मुंबई ) येथे दर्शना भीमराव य आंबेडकर, मनिषा आनंदाराज आंबेडकर, डॉ हरीश रावलिया (ट्रस्टी चेअरमन ), अँड सुभाष जौजाळ (रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन )यांच्या प्रमुख उपस्थित व एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख )यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमाताई (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ), डॉ अँड एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ), भिकाजी कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शाखा ), स्वातीताई शिंदे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला शाखा ), उत्तम मगरे (अध्यक्ष, मुंबई प्रदेश शाखा ), वैशालीताई अहिरे (अध्यक्ष, मुंबई प्रदेश महिला शाखा ) यांनी ताईसाहेब यांच्या 45 वर्षांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी केले.
आदरणीय ताईसाहेब यांना केंद्रीय कार्यालयातील केंद्रीय पदाधिकारी, केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय महिला विभाग, संरक्षण -समता सैनिक दल विभाग, धम्मयान विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हाच्या सर्व पुरुष /महिला पदाधिकारी यांनी प्रत्येकी एक हजार ची वर्गणी काढून पाचशे च्या नोटांचा 1लाख रुपयेचा हार घालून सन्मान करण्यात आला व 10 किलोचा केक कापण्यात आला.
यावेळी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा जन्मदिवस ” बौद्ध स्वाभिमान दिन म्हणून आणि सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस “बौद्धाचार्य दिन” म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी केंद्रीय, महाराष्ट्र, मुंबई प्रदेश,ठाणे,
नवीमुंबई,पालघर, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूर,औरंगाबाद, सातारा, पुणे व मुंबई मधील झोन शाखांचे आणि समता सैनिक दलाचे सैनिक, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठयासंख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत