महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

माझ्या कमाईतील हा खारीचा वाटा वंचितांच्या लढ्यासाठी !- नागाताई लोखंडे.

वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाताई लोखंडे या ज्येष्ठ माऊलीने आपल्या पेन्शनमधील एक लाख रुपये आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केले.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभर महासभा होत आहेत. या सभांना लाखोंच्या संख्येने जनसमुदाय स्वतःच्या पैशाने आणि स्वतःची भाजी भाकरी घेवून येतो. कुणासाठी गाडी पाठवली जात नाही, ना कुणाला पैसे देवून आम्ही गर्दी जमवत नाही. स्वाभिमानी जनता तन मन आणि धन देवून बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सत्ता परिवर्तनाचा लढा बळकट करण्याची धमक फक्त आणि फक्त अशा दिलदार आणि स्वाभिमानी जनतेमध्ये आहे.

बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला आहे. आता आम्ही कुणाचे गुलाम म्हणून मेंढरासारखे जाणार नाही, तर या निवडणुकीत आम्ही सत्ता परिवर्तन घडवणारच हा विश्वास या माऊलीने या स्वतःच्या कमाईतील खारीचा वाटा बाळासाहेबांना देवून दाखवला आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या माऊलीसारख्या हजारो माऊलींना सलाम..!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!