आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने
बाळासाहेब ननावरे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
युरेशियन ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक लिहिलेल्या विकृत इतिहासाची काही उदाहरणे:-
१- अ) पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले
ब) मराठ्यांचे पानिपत झाले.
यामध्ये “झेंडा लावणे” हा वाक्यप्रचार मराठी व्याकरणात रूढ झालेला आहे. झेंडा लावणे म्हणजे विजय प्राप्त करणे” असा अर्थ आहे. पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले याचा अर्थ पेशव्यांचा विजय झाला. कुठपर्यंत त्यांनी विजयाची पताका फडकावली ? अटकच्या ही पुढे अटक हे ठिकाण आहे. व ते सध्या पाकिस्तानात आहे. युरोशियन ब्राह्मण इतिहासकारांनी आम्हाला सांगितले की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजे पेशव्यांचा विजय झाला. पेशवे म्हणजे नेमके कोण ? तर पेशवे म्हणजे केवळ आणि केवळ युरेशियन ब्राह्मण होय. याचा अर्थ पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजे युरेशियन ब्राह्मणांनी अटकेपार झेंडे लावले. पेशव्यांचा विजय झाला म्हणजेच युरोशियन ब्राह्मणांचा विजय झाला. युरेशियन ब्राह्मण इतिहासकारांनी पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असे सांगितले त्यासोबतच “मराठ्यांचे पानिपत झाले” असा इतिहास सांगितला पानिपत झाले म्हणजे पराभव झाला. पानिपत होणे म्हणजे पराभव होणे हा वाक्यप्रचार मराठी व्याकरणात रूढ झाला आहे. मराठ्यांचे पानिपत झाले म्हणजे मराठ्यांचा पराभव झाला. तोही दारून पराभव झाला असे युरेशियन ब्राह्मण इतिहासकारांना येथे सुचवायचे आहे. पानिपत हे ठिकाण आहे व हे ठिकाण सध्या भारतातील हरियाणा राज्यात आहे. व हरियाणा राज्यातील तो एक जिल्हा आहे. पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजे पेशव्यांचा अर्थात युरेशियन ब्राह्मणांचा विजय झाला व मराठ्यांचे पानिपत झाले म्हणजे मराठ्यांचा पराभव झाला” असे युरेशियन ब्राह्मण इतिहासकार का सांगतात. हा खरा प्रश्न आहे. समजा पेशवे+मराठे जर एकच होते, जर पेशवे म्हणजेच मराठे होते, पेशवे आणि मराठ्यांचे राज्य एकच होते तर विजय झाला तरी पेशव्यांचा व पराभव झाला तरी पेशव्यांचाच, किंवा विजय झाला तरी मराठ्यांचा व पराभव झाला तरी मराठ्यांचाच, असे लिहायला हवे होते. परंतु युरेशियन ब्राह्मण इतिहासकारांनी असे न लिहिता विजयाचे श्रेय केवळ युरेशियन ब्राह्मणांना दिले व पराभवाचे खापर मराठ्यांच्या माथी फोडले. हा आहे विकृत इतिहास. आज तेच युरेशियन ब्राह्मण, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, ‘मराठी बोलतो तो मराठा, मराठ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, मराठी पाऊल पडते पुढे……. वगैरे वगैरे सर्व गोष्टी मराठी या शब्दाला केंद्रीभूत करून बोलतात आणि तेथेच असे का लिहिले ? कसे ? पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजेच युरेशियन ब्राह्मणांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजेच युरेशियन ब्राह्मणांचा विजय झाला व मराठ्यांचे पाणीपत झाले याचा अर्थ मराठ्यांचा पराभव झाला तोही दारून पराभव झाला. पेशवे आणि मराठे एकच होते तर ते असा फरक का करतात ? हे समस्त ब्राह्मणेतरांनी आणि खास करून मराठा कुणबी बांधवांनी समजून घेतले पाहिजे.
आणखी आश्चर्याची गोष्ट अशी की पानिपतला जी लढाई झाली त्याचे नेतृत्व तर सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, चिमाजी आप्पा यांच्याकडे होते आणि ही मंडळी तर युरेशियन ब्राह्मण होती. तरी पानिपतच्या पराभवाचे खापर बिचार्या मराठा कुणब्यांच्या माती का फोडले जात आहे, हे मात्र अनाकलीनीय आहे. ही आहे त्यांची हातचलाखी हे आहे इतिहासाचे विकृतीकरण ‘विजय आमचा’ आणि पराभव तुमचा याचा अर्थ पेशवे आणि मराठी वेगळे आहेत.
(२) युरेशियन ब्राह्मणांच्या विकृत इतिहासाचे आणखी एक उदाहरण उद्या पोस्ट नंबर तीनवर पाहूया.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
धम्म प्रसारक बाळासाहेब ननावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत