आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने


बांधवांनो- आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने :-
बहुजन समाजासमोर आज हजारो समस्या आहेत. या सर्व समस्या युरेशियन ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता आदिवासींचे अलगीकरण, धर्मातरितांची असुरक्षितता आणि महिलांची गुलामी या त्या हजारो समस्यातील प्रमुख समस्या आहेत. त्यासोबतच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन….. या ही आपल्या मूलभूत समस्या आहेत. परंतु सर्वात मौलिक समस्या आहे गुलामगिरीची आणि त्यावर उपाय आहे. स्वातंत्र्य म्हणून आपल्याला दुसरे स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करावे लागेल, नवे स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करावे लागेल.
नवे किंवा दुसरे स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करण्यासाठी असलेल्या समस्या-
१) ज्या बहुजन समाजाला स्वातंत्र्य करावयाचे आहे, त्याला असे वाटते की, आम्ही 15 ऑगस्ट 1947 लाच स्वातंत्र्य झालो आहोत. पुन्हा नव्याने स्वातंत्र्य होण्याची काय आवश्यकता ?
२) बहुजनांच्या समर्थनाशिवाय आपल्याला दुसरे स्वातंत्र्याचे आंदोलन उभारता येणार नाही. म्हणून या बहुजन समाजाला खरीखुरी माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा इतिहास पहावा लागेल.
इतिहासाचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासयाबद्दल म्हणतात-
१) जो कौम अपना इतिहास नही जानती वह आपना भविष्य निर्माण नही कर सकती”
२) अगर हम इतिहास से सबक नही सिखते इतिहास जरूर सबक सिखाता है ” याचा अर्थ आपल्याला आपले उज्वल भविष्य निर्माण करायचे असेल तर आपला इतिहास माहीत असला पाहिजे. दुसरे असे की इतिहासापासून आपण धडा शिकलो नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय म्हणजे अद्दल घडविल्याशिवाय राहत नसतो. म्हणून इतिहासापासून धडा शिकला पाहिजे. बोध घेतला पाहिजे. जेणेकरून वर्तमानकाळात मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये व भविष्यकाळ बिघडू नये. तिसरे असे की आपण आपला नवा इतिहास निर्माण करू इच्छितो आणि नवीन इतिहास घडविण्यासाठी मूळ जसा घडला तसा इतिहास आपल्याला समजून आणि माहीत करून घ्यावा लागेल.
खरा इतिहास समजून घेण्यातील अडचणी:-
भारताचा इतिहास ज्यांनी घडवला, त्यांनी लिहिला नाही. कारण त्यांना लिहिण्याचे अधिकार नव्हते आणि भारताचा इतिहास ज्यांनी घडवला नाही, त्यांनी लिहिला. कारण त्यांना लिहिण्याचे अधिकार होते. याचा अर्थ भारताचा इतिहास युरोशियन ब्राह्मणांनी घडवला नाही. परंतु त्यांनीच लिहिला कारण त्यांना लिहिण्याचे अधिकार होते म्हणून त्यांनी भारताचा इतिहास ब्राह्मणांना अनुकूल हवा तसा लिहिला. युरेशियन बामणांनी भारताचा इतिहास हा त्यांच्या विजयाचा, त्यांच्या गौरवाचा, त्यांच्या गौरवाचा त्यांच्या अभिमानाचा इतिहास लिहिला. थोडक्यात युरेशियन ब्राह्मणांनी भारताचा इतिहास हा विकृत करून लिहिला. युरोशियन बामनांनी जाणीवपूर्वक लिहिलेल्या विकृत इतिहासाची काही उदाहरणे:- उर्वरित भाग उद्या पोस्ट नंबर दोन वर वाचावा ही विनंती.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
धम्म प्रसारक बाळासाहेब ननावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत