की, सगळीच सोची समझी चाल ?… डॉ. डी. एस. सावंत
शिक्षण विभागाने शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक लागू करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होऊ लागला. त्याचाच एक भाग म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रायगडच्या पायथ्याशी चवदार तळ्यावर पुन्हा एकदा 1927 च्या विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनुस्मृती दहनाची पुनरावृत्ती करण्याचा आव्हाड यांनी छोटासा प्रयत्न केला. यामध्ये विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनुस्मृतीच्या दहनाची काही पोस्टर्स छापण्यात आली होती. त्याचं कारण असं की, मनुस्मृतीचा विरोध विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता कारण ती विषमता पोषक आणि समता विरोधी आहे. ती चातुर्वर्ण समर्थक आहे. ती उच्च नीच असा भेद करते आणि नीच ठरवलेल्या माणसाला हीन, दिन आणि दरिद्री बनवते. म्हणून तिचा निषेध करणारी काही पोस्टर्स छापली होती आणि बाबासाहेबांनी ती कशी जाळली हे त्या पोस्टर वरती होते.
खरे तर हे पोस्टर प्रचारासाठी बनवले होते. ती पोस्टर्स फाडण्याचं डॉ. जितेंद्र आव्हाड यांना काहीच कारण नव्हतं. असे असताना आव्हाड त्यांनी तसं का केलं ? हा प्रश्न मला पडला. दैनिक जागृत भारत निषेध करतो, अजानतेपने केलेल्या कृत्याचा सुद्धा दैनिक जागृत भारत निषेध करतो. नक्कीच ही चूक अक्षम्य आहे. यामुळे विरोधकांच्या हाती नेमकं कोलीत देऊन या प्रश्नाला दुसरीकडेच वळवण्याचा तर काही प्रकार नव्हता ना? अशीही शंका का येऊ नये? सध्या देशामध्ये अनेक समस्या आहेत. लोकसभेचे इलेक्शन अजून पूर्ण झालेले नाहीत. लवकरच लोकसभेचा शेवटचा टप्पा संपून चार तारखेला मतमोजणी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जन माणसांमध्ये एक प्रक्षोभ निर्माण करायचा, त्यामध्ये काही आंबेडकरवादी उठतील? काही मनुवादी मनुस्मृती दहनाचे दुःख ऊरात घेऊन बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचे निमित्त करून मगरमच्छचे अश्रू ढळतील आणि जितेंद्र आव्हाडला विरोध करतील आणि समाजामध्ये एक अस्थिर, भेदरलेलं असं वातावरण निर्माण करण्याचा, प्रक्षोभ निर्माण करायचा तर काय डाव तर नव्हता ना हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक लागू करण्याचा आंबेडकरी नेत्यांनी, संघटना नी किंवा राजकीय पक्षांनी पुढे रस्त्यावर येऊन त्याचा प्रत्येक्ष विरोध केला आहे. नेहमीच आताताईपणा करणारे जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी प्रमाणे पुरोगामी विचारधारेचे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक ? यांनी रायगडा च्या पायथ्याशी चवदार तळ्यावर पुन्हा एकदा 1927ची मनुस्मृती दहन करण्याची पुनरावृत्ती केली, याच वेळी अवेशात जितेंद्र आव्हाड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला परंतु मनुवादी विचारांच्या लोकांनी याचा आधार घेऊन मनुस्मृती दहणाचाच विरोध केला आहे, या लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला त्याच काहीच देणं घेणं नाही फक्त याचा आधार घेऊन मनुस्मृतीचा विरोध आणखी वाढू नये म्हणून ही नौटंकी लोक हे ड्रामा बाजी करत आहेत,
या अगोदर या मनूवादी विचारांच्या लोकांनी कित्येक वेळा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना केल्या, संविधान जाळलं त्या वेळी का ही पिल्लंवळ का रस्त्यावर उतरली नाही,त्यावेळी का ही लोक विरोध करत नाही उलट त्या आरोपी ला मानसिक रुग्ण नशाडी म्हणून पाठीशी घालतात ,त्यांना फोटो फाडल्या काहीच सोयरे सुतक नाही, त्यांना फक्त मनुस्मृती दहना चा विरोध या माध्यमातून करायचा आहे, आणि म्हणून हे नाटकी चालली आहेत,तर फक्त एकच कारण या घटनेत बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडला म्हणून नाही तर मनुस्मृती का जाळली म्हणून हा विरोध हे करता आहेत.
हे जनतेला कळलं पाहिजे कोणत्याही स्वार्थी गिधादांच्या बहकाव्यात येऊ नये, कालच्या आंदोलनाने मनुस्मृतीचा विरोध होण्यास सुरवात झाली होती, आणि हे आंदोलन महाराष्ट्रात पेट घेणार होतं तोच त्याला फोटो फाडल्याच्या कारणावरून दाबून टाकण्या चा प्रयत्न आहे, आणि म्हणून यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति पुळका आहे असे अजिबात नाही.
जितेंद्र आव्हाड यांनी या बाबतीत सावध राहिले पाहिजे. अशी चूक त्यांच्या हातून होता कामा नये. नक्कीच ही चूक अक्षम्य आहे. अन्यथा जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो, असा चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. सगळीच सोची समझी चाल आहे? असे लोकांना वाटेल. सध्या तरी जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर क्षमा याचना मागितली आहे, परंतु मनुस्मृतीचा मुद्दा मागे पडता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक शैक्षणिक अभ्यासक्रमात लावले जाऊ नयेत. यासाठी सर्वांनी दक्ष रहावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत