युनिटी मल्टीकॉनचे मुख्य प्रवर्तक संस्थापक कफिल मौलवी हे आम्मा पुरस्काराने सन्मानित
फफील मौलवी हे सामाजिक कार्यात आग्रेसर
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
कै.यमुनाबाई रंगराव अहंकारी प्रतिष्ठान च्या वतीने यावर्षीपासून प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आम्मा पुरस्काराने युनिटी मल्टीकॉन चे मुख्य प्रवर्तक संस्थापक कफिल मौलवी यांना सन्मानित करण्यात आले .
यावर्षी हे दोन पुरस्कार युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि.चे कार्यकारी संचालक कफिल मौलवी आणि सोलापूरचे प्रसिद्ध आर्किटेक योगेश अहंकारी यांना देण्यात आले
मा. कफिल मौलवी यांना आम्मा पुरस्कार देवून गौरविण्यात आले युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक मा.कफिल मौलवी यांना सामाजिक क्षेत्रातल्या कार्याबद्दल आज आम्मा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले
यावेळी नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार विलास येडगे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , पत्रकार उत्तम बनसगोळे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव ,युनिटीचे अब्दुल्ला साहेब , घाडगे व सोलापूर युनिटी ऑफिसचे सर्व कर्मचारी उपस्थित होते
यावेळी सुरुवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी या पुरस्कार विषयी सविस्तर माहिती दिली
यावेळी बोलताना मा.कफिल मौलवी साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना युनिटीचा आजपर्यंतचा इतिहास सांगितला व पुरस्कारा बद्दल धन्यवाद व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. श्री. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सोलापूरचे आर्किटेक योगेश बाबुराव अहंकारी यांना आम्मा पुरस्कार देण्यात आला
सामाजिक व उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर लोकांना हा पुरस्कार या वर्षी दिला जातो .
सामाजिक कार्याचा आढावा घेऊन कफिल मौलवी यांना या वर्षाचा आम्मा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल नळदुर्ग आणि परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुक अभिनंदन केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत