महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

संघाचा २०२५ चा अजेंडा असा असू शकेल काय?

अशोक सवाई

            ४ जून नंतर आर एस एस प्रणित भाजपची सत्ता येईल किंवा नाही या विषयावर देशातील राजकीय निरिक्षक, निवडणुकीचे विश्लेषक व जनतेत ही या सर्वांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. तसेच भाजप व आर एस एस हे टोकाच्या गैर मार्गाचा अवलंब करून सत्ता सोडणार नाहीत. असेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. 

            ॲड. अविनाश काले, अकलूज. हे 4 जून "काहीतरी भयानक घडण्याचा संभव गाफील राहू नका... या आपल्या लेखात म्हणतात. "मोदी जी व अमित शहा सत्ता सहजा सहजी सोडतील की, सत्तेवर राहण्यासाठी सर्व प्रकारचे बल वापरून आपल्या विरोधकांना चिरडून ते सत्तेवर राहतील? याच्या संबंधाने गंभीर अशा चर्चा देशात चालू आहेत. 

” द पब्लिक इंडिया “
नावाचे यू ट्यूब चॅनल आहे, ज्याचे संपादक आनंद वर्धन सिंग हे आहेत
त्यांनी 21/5/2024 या तारखेला त्यांचे चॅनल वरून सांगितले की, देशाच्या संसदेची पूर्व पार चालत आलेली parlmentari security staf आणि CRPF यांच्या 1400 सुरक्षा रक्षकांना हटवून त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री यांच्या कमांड खाली असलेल्या CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या अर्ध सैनिक दलाच्या 3317 संख्या असलेल्या सुरक्षा रक्षका कडे संसदेची सुरक्षा सोपवण्यात आलेली आहे.
3 मे ला NSG (National Security Gard) व दिल्ली पोलीस यांनी संसदेवर हल्ला झालाच तर संरक्षण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक
Mock drill केले आहे ज्यात अगदी हेलिकॉप्टर ही वापरण्यात आली होती
देशात निवडणूका धामधुमीत चालू असताना दुसऱ्या बाजूने हे घडत आहे.
ही बाब तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य वाटेल पण ती खरोखरच तशी आहे काय? याचा ही विचार आपण केलाच पाहिजे”

            वरीलप्रमाणे देशात जर अशी चर्चा सुरू असेल तर ४ जून नंतर देशाची किती भयानक स्थिती होवू शकते याची सूज्ञ वाचकांना कल्पना आली असेल. संविधान बदलणे, हिंदू राष्ट्र बनवणे याच्याही पलीकडे जाऊन पुण्यातील एका कार्यक्रमात एका ब्राह्मणाच्या विधानाद्वारे कल्पनेच्या बाहेर जाऊन भयंकर संकेत मिळाल्याचे जाणवले होते. 

            जे नागरिक चालू घडामोडीं वर बारीक लक्ष ठेवून असतात त्यांना पुण्यातील 'त्या' कार्यक्रमाची कल्पना असेल. मागील वर्षी म्हणजे २९ आक्टोबर २०२३ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी 'ब्राह्मण रत्ने' ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला होता. त्यात गोविंद हर्डीकर, राहुल सोलापूरकर, अविनाश धर्माधिकारी अशी ब्राह्मण मंडळी सहभागी झाली होती त्याच कार्यक्रमात विद्यावाचस्पती (?) शंकर अभ्यंकर नावाच्या ब्राह्मणाने एक भयंकर मागणी केली होती तो म्हणतो 'ब्राह्मणांसाठी वेगळे राष्ट्र पाहिजे' म्हणजे हा देशाच्या सार्वभौमत्वावर घालाच म्हटला पाहिजे. शंकर अभ्यंकराने वरील भयंकर मागणी करून विनाकारण आपल्या तोंडाची वाफ घालवली असे बिलकुल म्हणता येणार नाही. आर एस एस च्या चित्पावनी गोटात असा गुप्त खल झाल्याशिवाय असे देशाचे तुकडे पाडणारे विधान त्याच्या मुखातून बाहेर पडले नसते. बरं त्यांचा इतिहासही देशाचे तुकडे पाडण्याचा राहिला आहे. नाही तर सम्राट अशोक कालीन जंबूद्विप नामक अखंड देशाचे असंख्य तुकडे झाले नसते. बरं शंकर अभ्यंकर याच्या 'त्या' भयंकर विधानाचा आजपर्यंत कोणत्याही ब्राह्मणाने खंडन केलेले नाही. 

            त्यांच्या काळ्या इतिहासाला अनुसरून तर्कशुद्ध व सुसंगत विचार केल्यावर असे लक्षात येते की, त्यांना त्यांच्या हिताची एखादी योजना पुढील १०० वर्षांनी अंमलात आणावयाची असल्यास त्यावर ते आजपासून काम सुरू करतात. त्यासाठी त्यांचे कर्मठ धुरंधर २४×७ तास खपतात. पेशवाई बुडाल्याचे दु:ख उरात घेऊनच पेशवाई सारखे निरंकुश वर्चस्ववादी राज पुन्हा या देशात स्थापन करण्यासाठी त्यांनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ साली स्थापना केली. त्यात हिंदू राष्ट्राची घोषणा करून मनुस्मृती प्रमाणे राज करावे, ते नाही जमले तर संविधानात भयंकर छेडछाड करून ते निष्क्रिय करून आपले वर्चस्ववादी हित संबंध जपावे. आणि तेही नाही जमले तर शेवटी या देशावर भयंकर घाव घालून पुन्हा देशाचे तुकडे करून आपल्यासाठी स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करावी. पुढील वर्षी म्हणजेच २०२५ ला रा. स्व. संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष ते आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करूनच साजरे करावे असे त्यांना वाटत असेल. परंतु येथील जागृत झालेला भूमिपुत्र मूलनिवासी बहुजन त्यांना प्राणांतिक विरोध करेल इतकेच नाही तर लष्करात असलेले मराठा, महार, शिख, व गोरखा ह्या बहुजन बटालियन्स सुद्धा देशासाठी आपल्या विरोधात जातील. हेही त्यांना चांगले ठाऊक आहे. अशा वेळी काही शंका काही प्रश्न उपस्थित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अभद्र घडामोडी घडतील काय? कारण विदेशी डीएनए असलेला ब्राह्मण मोठा चिवट प्राणी आहे. 

             जर तर्कसंगत विचार केला तर हे लक्षात येते की,  लडाख पासून अरूणाचल प्रदेशा पर्यंत भारताच्या उत्तर सीमेलगतचा चार साडेचार हजार किलोमीटरच्या भूभागावर चीनने कब्जा केला आहे. नुसता कब्जाच नाही तर त्या भागात त्याने वसाहती उभारल्या, रस्ते तयार केले, हेलिपॅड उभारले. चीनने देशाच्या भूभागावर केलेले अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी लडाखचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यक्तिमत्त्व सोनम वांगचूक हे मायनस डिग्री सेल्सियस च्या कडक थंडीत उपोषणाला बसले होते. चीन भारताच्या सीमा भागात घुसला तरी भारत सरकार ढिम्म का? यावर भारत सरकारची दातखिळी का बसली? मोदी जेव्हा विरोधात होते तेव्हा लाल लाल डोळे करून चीनकडे बघण्याचा सल्ला तेव्हाच्या भारत सरकारला देत होते. आता तर मोदी खुद्द देशाचे प्रधानमंत्री आहेत. ते लाल लाल डोळे करून चीनकडे का बघत नाहीत? की चीनच्या दिशेने साधी नजर उचलून बघण्याची हिंमत होत नाही त्यांची? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 'चीनकडे मोठे सैन्य आहे' असे आपल्याच सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचे विधान करतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे तर मौन धारण करून आहेत. हे सारे मंत्री संत्री म्हणजे 'आम्हाला पहा अन् फुले वाहा'. अशा प्रकारचे आहेत का? की कर्तृत्व शुन्य म्हणायचे? की भविष्यात आपल्याला चीनची मदत घ्यावी लागेल तेव्हा चीन विषयी काहीही विधान करू नये असे आर एस एस ने त्यांचे कान फुंकले का?  

            तिसरा तर्क नवीन सार्वजनिक संसद भवनाचे भूमीपूजन व नंतर त्याचे उद्घाटन सरकारने सरकारी पैशाने एका विशिष्ट धर्मगुरूंच्या हस्ते एका विशिष्ट धर्म विधी पध्दतीने का केले? तेही भारतीय घटनेची मनाई असताना? त्या संसदेत राजदंड सोडून धर्मदंड का ठेवला? सरकारी राजमुद्रेच्या प्रतिमेत बदल का करण्यात आला? नवीन संसद भवन आर एस एस च्या मनातील 'मनुस्मृती भवन आहे का? की उद्या त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केलीच तर त्याची सर्व तयारी आधीच करून ठेवली का? असे अनेक भयंकर प्रश्न शंकेकडून खात्री कडे घेऊन जाण्याचे संकेत देतात. अशा गंभीर प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जावू नये व त्यासाठी संविधान बदलने/खतम करणे, हिंदू राष्ट्र, हिंदू मुसलमान, मणिपूर, महागाई, भ्रष्टाचार असे भडक मुद्दे चर्चेत ठेवून आपली वेळ येईपर्यंत जनतेला त्यात गुंतून ठेवावे. व इकडे आपण आपले काम  एकाएकी करून घ्यावे. ऐन वेळेवर जनता गोंधळून जाईल म्हणजे तिच्यात विरोध करण्याचे सामर्थ्य राहणार नाही. आणि केलाच विरोध तर तो बंदुकीच्या टोकावर चिरडून टाकावा. असे आर एस एस ब्राह्मणांचे षडयंत्र आहे का? जसे जसे दिवस उलटत जातील तसे तसे वरील गंभीर मुद्दे अधिक स्पष्ट होत जातील. तोपर्यंत वर ॲड. अविनाश काले म्हणतात त्याप्रमाणे आपण गाफील राहू नये. हे खरे. 

तू म्हटला होता मतदार राजा
‘हा नाही तर दुसरा अजमावून पाहू’,
पण दुसरा तर निघाला त्याचाही वस्ताद भाऊ

बा… मतदार राजा
तू ‘अच्छे दिना’ला भूलला,
अन् आपला घात करून घेतला.

अशोक सवाई
किवळे, पुणे.
91 5617 0699.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!