दहावीचा निकाल आज .. दुपारी 1 वाजता ची प्रतीक्षा !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेचा निकाल आज, सोमवार २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. MSBSHSE बोर्डाच्या वतीने शनिवारी निकालाच्या तारखेबद्दल अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.
आज, सोमवार दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता १० वी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.
या सह इतरही वेब साईट वर निकाल पाहता येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत