अक्षय तृतीया व लग्नसराई निमित्त बालविवाह निर्मूलन जागृती..!
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली व युवा ग्रामीण विकास मंडळ यांच्यावतीने धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी, बोरखेडा, बेंबळी, कनगरा, टाकळी, पाडोळी, घुगी, मेंढा आदी 10 गावात बालविवाह निर्मूलनाचे काम सुरू आहे. सध्या अक्षय तृतीया व लग्नसराई निमित्त ग्रामीण भागात विवाह चे अधिकप्रमाण असते. त्यात बालविवाह हि घडत असतात हे रोखणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक ठिकाणी जाऊन धर्मगुरुयांच्या भेटी घेऊन त्यांना माहिती दिली जाते.भारत 2030 पर्यंत बाल विवाह मुक्तकरायचा आहे. त्यासाठी आपले सहकार्य खूप महत्वाचे आहे. याबाबत जनजागृतीकरण्याचे काम चालू आहे.तसेच गावातील ग्रामसेवक,सरपंच, अंगणवाडी, सामाजिक कार्यकर्ते, यांच्यासोबत चर्चा करून गाव स्तरीय बाल संरक्षण समिती सक्षम करण्याविषयी काम सुरू आहे. तसेच गावातील किशोरवयीन मुलं मुली, गावातील लोक, महिला बचत गटातील सदस्य, शाळेतील कर्मचारी गावकरी यांच्यासोबत विविध कार्यक्रमाच्या आधारे बालविवाह रोखने बाबत विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करण्यात येत आहे.
धाराशिव तालुक्यातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, इत्यादी ठिकाणी जाऊन बालविवाह निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. युवा ग्राम संस्थेच्या संस्थेचे प्रमुख एच पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समूहसंघटिका (CSW ) सुवर्णा पंढरे ह्या प्रभावीपणे काम करीत आहेत. तसेच कुटुंबात जाऊन बालविवाह करणार नाही असे पालकाची जनजागृती करून हमीपत्र लिहून घेण्यात येत आहेत.युवा ग्राम संस्थेचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब वडवे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात अवती भवती लग्न सराईतबालविवाह होत असल्यास संस्थेच्या कार्यकर्त्या सुवर्णा पंढरे व चाईल्ड लाईन, बाल संरक्षण समिती, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करावा. आपण सर्वांनी एकत्र येऊन 2030 पर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनीप्रयत्नशील राहावे असे विनंती करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत