आता डिबीटी मार्फत मिळणार लाभार्थाना थेट अनुदान .
निराधारांना शासनाचा आधार
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी तलाठी कार्यातयात कागजपत्रे सादर करण्याचे अव्हान
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
शासनाकडून निराधार व्यक्तींना योजनेच्या माध्यमातून महिन्या काठी ठराविक मानधन दिले जात होते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील कार्यालयातून दिले जात होते मात्र आता शासनाची योजना निराधारांना शासनाचा आधार म्हणून थेट डीबीटी मार्फत निराधार लाभार्थ्यांना अनुदान वर्ग होणार आहे .
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसील कार्यालयाकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून दिल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता आणि त्यानंतर निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेस खूप मोठा विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध अपंग , मुकबधीर लाभार्थी बँकांत खेटे घालावे लागत होते .
आता निराधारचे अनुदान थेट डिबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे या योजेने मुळे निराधारांची हेळसांड थांबणार आहे
बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे त्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या निराधारा कडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया तुळजापूर तहसील विभागाकडून सुरू करण्यात येत आहे याबाबत गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधित लाभार्थ्यांनी आपले सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयामध्ये सादर करण्याचे आवाहन तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंबे , नायब तहसीलदार मोहन पांचाळ यांनी केले आहे .
संजय गांधी निराधार श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्याने ३० मे पर्यंत आधार कार्ड मोबाईल नंबर तलाठी कार्यालय जमा करावे एक ही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहे
“
चौकट
ही द्यावी लागणार कागजपत्रे
१) हयात आसलेले प्रमाणपत्र
२) आधारकार्ड ,
३) बँकेचे पासबुक
४) बँकेत लिंक आसलेला मोबाईल नंबर
वरिल कागजपत्र तात्काळ तलाठी कार्यालयात जमा करावी जे लाभार्थी आपल कागज पत्र सादर करणार नाहीत त्यांचे अनुदान बंद होणार
तरी सर्व लाभार्थानी तात्काळ आपली कागजपत्रे तलाठी कार्यालयात सादर करावे आसे अवहान तुळजापूरचे तहसिलदार अरविंद बोळंगे व नायब तहसीलदार मोहन पांचाळ महसुल सहाय्यक राहुल वाघमारे अमित सोनवणे यांनी केले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत