भारतात डिजिटल रुपयाहोणार लॉन्च

आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे डिजिटल रुपयाबाबत . डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी सांगितले की, भारतीय रिझव्ह बँक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलनचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे.
रिझव्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात सेंट्रल बँक डिजिटल चलनचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करेल, अजय कुमार चौधरी यांनी जी 20 शिखर परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022- 23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत