उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा उज्जायी प्राणायाम.

सध्याच्या व्यस्त जीवनामुळे आपल्या आजूबाजूला अनेक जण ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. बहुतेकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. काहींना वाढत्या वयामुळे, मुत्रपिंडाचे विकार, अनुवांशिक, लठ्ठपणा किंवा काही इतर कारणांमुळे बीपीचा त्रास होतो. आधी वयाच्या ५० वर्षानंतर ही समस्या व्हायची. पण आता बदललेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा आजार फार कमी वयातच होत असल्याचं दिसून येत आहे. तरुणाईलाही ब्लड प्रेशर संदर्भातील समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मात्र योगासनांद्वारे तुम्ही रक्तदाबाच्या समस्यांवर नियंत्रण मिळवू शकता.
बीपीसाठी योगाभ्यासात समाविष्ट केलेल्या पद्धतींपैकी एक म्हणजे उज्जयी प्राणायाम. हा एक साधा प्राणायाम आहे जो मनाला शांत करतो आणि रक्तदाब नियंत्रित करतो. योगींनी, प्रायोगिक आणि अंतर्ज्ञानी ज्ञानाद्वारे, शरीराच्या विविध प्रणालींचे नियंत्रण कसे केले हे दाखवले आहे. उज्जयी प्राणायामास इंग्रजीमध्ये ‘विक्टोरिएस ब्रिथ’ असे देखील म्हटले जाते. उज्जयी प्राणायाम आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अभ्यासला जातो. शरीराच्या श्वसनतंत्रास नियंत्रित करण्यासाठी उज्जयी प्राणायाम केला जातो. प्राणायाममध्ये अनेक प्रकार असतात मात्र मन एकाग्रतेसेठी ‘उज्जयी’ प्राणायाम करणे अधिक फायदेशीर ठरते. प्राणायाम अथवा योग हे पहाटे म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेस करण्याची योग्य वेळ आहे. रोज प्राणायाम केल्याने त्याचे अनेक फायदे तुमच्या शरीसाठी होतात.
उज्जायी प्राणायामामुळे टॉन्सिल, थायरॉईडमध्ये लाभ होतो, घशाचे सर्व विकार दूर होतात, झोपेत घोरण्याची सवय बंद होते. आत्मविश्वास खूप वाढतो. मनाची एकाग्रता वाढते. मानसिक ताण, निद्रानाश या आजारापासून मुक्तता मिळते.
अशाप्रकारे कार उज्जयी प्राणायाम
उज्जयी प्राणायाम करण्यासाठी सर्वांत प्रथम पायाची मांडी घालून चटईवर खाली बसावे. त्यानंतर डोळे बंद करावे.
डोळे बंद केल्यानंतर हाताच्या बोटांनी एका नाकपुडीतून हळूवारपणे श्वास आत घ्या आणि काही सेकंदांनंतर दुसऱ्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा.
यासाठी हाताच्या अंगठ्याचा आणि तर्जनी या बोटांचा वापर करावा.
ही प्रक्रिया किमान १० मिनीटे करत रहा. प्राणायम मधील हा सर्वात सोपा प्रकार आहे.
जर तुम्ही दिवसातून अर्धा तास योग करत असाल तर त्यातील १० मिनीटे उज्जयी प्राणायाम करून तुम्ही मानसिक आजार दूर करू शकतात.
यासोबतच आपल्या आहारात मीठाचे प्रमाण कमी केले पाहिजे, धूम्रपान यासारख्या उत्तेजक घटकांचे सेवन नियंत्रित केले पाहिजे तसेच चहा किंवा कॉफी, मद्यपान आणि अति खाणे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ताजी फळे आणि भाज्यांचा आहार आणि चांगली झोप घेतल्यास तुम्हाला बीपीपासून मुक्त होण्यास मदत होईल. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात. कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि उच्च रक्तदाब घटकांची तपासणी न करता कोणतीही औषधे थांबवू नका किंवा बदलू नका.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत