गाफील राहू नका

ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न 9960178213
देशाचे भवितव्य ठरवणारा , सत्ता कोणाकडे येणार ? की सत्ता आहे तेथेच राहणार याचा फार मोठा
फैसला होणार आहे .
पण दुसऱ्या बाजूने हे सत्ता परिवर्तन झालेच तर ते शांती पूर्वक , होईल का ?
मोदी जी व अमित शहा यांच्या अधिपत्याखालील सत्ता ते सहजा सहजी सोडतील की , सत्तेवर राहण्यासाठी सर्व प्रकारचे बल वापरून आपल्या विरोधकांना चिरडून ते सत्तेवर राहतील ? याच्या संबंधाने गंभीर अश्या चर्चा देशात चालू आहेत .
“द पब्लिक इंडिया “
नावाचे यू ट्यूब चॅनल आहे , ज्याचे संपादक आनंद वर्धन सिंग हे आहेत
त्यांनी 21/ 5/ 2024 या तारखेला त्यांचे चॅनल वरून सांगितले की , देशाच्या संसदेची पूर्व पार चालत आलेली parlmentari sequrity staf . आणि CR PF यांच्या 1400सुरक्षा रक्षकांना हटवून
त्या ठिकाणी
केंद्रीय गृह मंत्री यांच्या कमांड खाली असलेल्या C I S F अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या अर्ध सैनिक दलाच्या 3317 संख्या असलेल्या सुरक्षा रक्षका कडे संसदेची सुरक्षा सोपवण्यात आलेली आहे .
3मे ला N S G ( National Sequrity Gard ) व दिली पोलीस यांनी संसदेवर हल्ला झालाच तर संरक्षण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक
Mock drill केले आहे ज्यात अगदी हेलिकॉप्टर ही वापरण्यात आली होती
देशात निवडणुका धामधुमीत चालू असताना दुसऱ्या बाजूने हे घडत आहे .
ही बाब तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य वाटेल पण ती खरोखरच तशी आहे काय? याचा ही विचार आपण केलाच पाहिजे .
जेंव्हा जेंव्हा भाजपचे सरकार सत्तेवर आले तेंव्हा तेंव्हा असे हल्ले झाले आहेत असे सरकारला वाटते ,
2001 मध्ये अफजल गुरू याने संसदेवर हल्ला केला होता
याच भाजपच्या सत्ता काळात कंधार विमान अपहरण नाट्य घडले होते आणि अती क्रूर अश्या अजहर महमूद , अहमद उमर सईद शेख , मुस्ताक अहमद झलगार या दहशत वाद्यांना भाजप चे केंद्रीय मंत्र्याने सोडले होते .
कांहीं महिन्या पूर्वी 4बेरोजगार युवकांना भाजप चे खासदारांनी परवाना पात्र दिल्या नंतर धूर ओकनाऱ्या नळकांड्या त्यांनी संसदेत व प्रांगणात फोडल्या होत्या .
याच भाजप चे काळात पठाण कोट विमान तळ हल्ला , व पुलवामा ही घडले होते .
4जून रोजी मतदानाचा निकाल असताना ही सुरक्षा का केली जात आहे? असे प्रश्न निर्माण केले जात आहेत .
निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहिले की संघाची आवश्यकता भाजप ला नाही असा बॉम्ब भाजप चे राष्ट्रीय अध्यक्षांनी फोडला ,
आणि सगळे भाजपा चे वैचारिक विरोधक या दोघात फाटले म्हणून खुश झालेले आहेत .
पण असे गाफील राहून चालणार नाही .
मोदी जी यांनी उत्कृष्ट काम केले आहे असे सर्टिफिकेट संघ प्रमुखांनी दिले होते , संघा चे अजेंड्यावर असणारे बहुतेक विषय मोदी जी यांनी हातावेगळे केले असताना संघ का म्हणून नाराज असेल?
आपणास आठवत असेल की
” सर संघ चालक मोहन राव भागवत यांनी 3तासात देशाची सुरक्षा करण्या साठी सैनिकांची जागा संघ स्वयंसेवक घेतील असे विधान केले होते .
दर वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्र पूजन संघ कार्यालयात केले जाते , आणि जिथे फक्त पारंपारिक हत्यारे नाहीत तर अगदी मॉडर्न हत्यारे ही आहेत ,
रिटायर झाले नंतर सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले आहे .
या सर्वांना हत्यार चालवण्याचे , युद्ध निती चे प्रशिक्षण झालेले आहे
” दुर्गा वाहिनी म्हणून संघाने महिला ना ही लढाईचे प्रशिक्षण दिलेले आहे
आणि मला तर संशय आहे
अग्नी वीर म्हणून जी 4वर्षासाठी सैन्य भरती केली गेली त्यात अनेक जण संघ वीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
आणि यातूनच अशी शंका व्यक्त केली जात आहे , जी कुमार केतकर लोकसत्ता संपादक यांनी ही व्यक्त केली होती ,
अगदी जनाधार जरी प्राप्त झाला नाही तरी मोदी जी सत्ता सोडणार नाहीत ,
आणि याला विरोध म्हणून लोक रस्त्यावर उतरले तर अर्ध सैनिक बल, पोलीस दल , अश्या अनेक केंद्रीय बल द्वारे हा विरोध चिरडला जाईल ,
आणि गृह युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर संघ स्वयंसेवक व दुर्गा वाहिनी सहित चे प्रशिक्षण घेतलेले समूदाय निशस्त्र विरोधकांवर तुटून पडतील , त्या नंतर सगळे वैचारिक विरोधक ही शोधून संपवण्याची मोहीम सुरू होईल ,
आणि बल वापरून देशाची राज्य व्यवस्था त्यांना हवी असलेल्या फॉर्म मध्ये ते स्थापित करतील
कदाचित हिंदू राष्ट्राची ही घोषणा अधिकृत रीत्या केली जाऊ शकते .
हे सगळे अंदाज आहेत , असे झाले नाही तर स्वागत आहे , पण पुरोगामी , लोकशाही वादी , धर्म निरपेक्ष , गांधी वाद , आंबेडकर वाद यावर विश्वास असलेल्या समाज घटकांनी गाफील ही राहू नये सतर्क रहा ,,, स्वतः चे व इतरांच्या सूरक्षे ची ही काळजी घ्या इतकेच आम्ही सांगू शकतो ,,,, जय हिंद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत