श्रामनेर संघाची मौजे पिंपरी येथे चरिका व धम्मदेसना !
पालकांनी तरुण पिढीला व्यसनाधीनते पासून दूर ठेवले पाहिजे – पी.एन वाघमारे
उस्मानाबाद : दिनांक 19/5/2024 दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्मृती बुद्ध विहार भीम नगर उस्मानाबाद येथे श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या श्रामनेर शिबिराच्या माध्यमातून धम्म साहित्य व संस्कार शिक्षण,बौद्ध धर्म,परिवर्तनवादी महापुरुषांचा इतिहास व चळवळ,बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने शिक्षण प्रशिक्षण चारिका आणि धम्म प्रचार करण्यात येत आहे.
याच चारिकेच्या अनुषंगाने आज सकाळी ठीक 11.30 वाजता श्रामनेर संघाने पिंपरी भीमनगर येथे भेट दिली.यावेळी श्रामनेर संघासोबत वरिष्ठ केंद्रीय शिक्षक पी एन वाघमारे सर नांदेड,केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे सर,तालुका पर्यटनचे सचिव धनंजय वाघमारे,श्रामनेर तथा संघनायक (संघपाल)विजय बनसोडे यांच्यासह सर्व श्रामनेर संघ यावेळी उपस्थित होता.यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन मोहन सपकाळ,भागवत बिडबाग,मारुती बिडबाग,किरण धाकतोडे,दशरथ बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी भीमनगर पिंपरी येथील तमाम बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्याचबरोबर यावेळी या श्रद्धावान उपासक उपासीकांच्या वतीने साम स्नेहभोजना भोजनदान देण्यात आले. भोजनदाना नंतर श्रामनेर शिबिराचे वरिष्ठ मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक पी.एन वाघमारे यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली.यावेळी बंटी बिडबाग,किरण धाकतोडे यांच्यासह अनेक श्रद्धावान प्रविण बिडबाग,प्रशांत बिडबाग
नामदेव बिडबाग,उद्धव माने, अभिमान बिडबाग,किशोर नाईकवाडी,पवन बिडबाग,चेतन बिडबाग, अलका धाकतोडे,सोनाली धाकतोडे,साधना बिडबाग,केराबाई बिडबाग,गिता बिडबाग,पुजा बिडबाग, बुकाबाई माने,शामल बिडबाग,सुनिता सपकाळ,भाग्यश्री सपकाळ,नंदाबाई बिडबाग,मैनाबाई बिडबागउपासकांनी कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था केली.पिंपरी येथील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत