दिनविशेष – मंगळवार दिनांक 14 मे 2024.
आज दि. १४ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, कुंजवारो, वेसाख मासो, मंगळवार, वैशाख माहे.
*१४ मे १९३८ – रोजी कोंकण पंचमहल महार परिषद मुक्काम कणकवली येथे महार अस्पृश्यांच्या झालेल्या प्रचंड सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “न्याय्य हक्कांसाठी तरुणांनी मरणही पत्करले पाहिजे.”
*१४ मे १९४५ – रोजी शेड्युल्ड कास्टस फेडरेशन मुंबई शहर शाखेतर्फे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत दामोदर गृहाच्या पाठीमागील बगीच्यात चहापार्टी आयोजित केली. या निमित्ताने सर्व मंडळाचे सभासद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गट छायाचित्र घेण्यात आले.
*१४ मे १९५६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांना “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाची टंकलिखित प्रत भेट दिली.
*१४ मे १९५९ – रोजी नागपूर येथे आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे अधिवेशन बी. सी. कांबळे यांनी भरविले. यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्ष दुरुस्त गट तयार केला. या गटात बी. सी. कांबळे यांच्यासोबत बाबू हरदास आवळे, दादासाहेब रूपवते, ए. जी. पवार आले. त्यामुळे दुरुस्त व नादुरुस्त असे दोन गट पक्षात पडले. नादुरुस्त गटाचे नेतृत्व एन. शिवराज यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत